शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

बीडमधून सुनील केंद्रेकरांना लोकसभेसाठी ‘आप’ची गळ


चांगली माणसे राजकारणात आली पाहिजेत. सर्वसामान्य माणूस राजकारणात आल्याशिवाय राजकारणातील कुप्रवृत्ती संपणार नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्ष बीडचे गाजलेले जिल्हाधिकारी
आणि सध्या सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांना बीडमधून लोकसभा निवडणूक लढवन्यासाठी गळ घालणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या पंधरा जानेवारीस बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आम आदमी पक्षाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केल्याचेही दमानिया यांनी संगितले.

दिल्लीतील यशानंतर आम आदमी पक्षाचे येत्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यावर भर राहील. त्यासाठी महाराष्ट्रातील शक्य तेवढ्या लोकसभा मतदारसंघातून आम आदमीचे उमेदवार देण्यात येणार आहेत. पक्षाचा किती मतदारसंघात बेस आहे याची चाचपणी औरंगाबाद येथे झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला. चार महिन्यांत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधून निवडणूक लढणे यास आपली प्राथमिकता असेल असे आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. भ्रष्टाचाराबरोबर आरोग्य शिक्षण, रोजगार आणि महागाई हे मुद्दे घेवून ही निवडणूक पक्ष लोकांसमोर जाईल. स्वच्छ चारित्र्याची माणसे निवडणुकीच्या राजकारणात आल्यास राजकारण बदलू शकेल. त्यामुळे, केंद्रेकर यांची भेट घेवून त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती करणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

नागपूरमधून अजून पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. राज्यातील दिग्गज उमेदवारांना टक्कर देण्याची गरज आहे. मात्र, मी एका मतदारसंघात अडकून पडू इछित नाही. महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघात जावून प्रचार करणेही राज्य समन्वय म्हणून महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...