गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून युवकास मारहाण.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून युवकास मारहाण.
तरोडा बु भागातील सोनाई नगर येथे नाली बांधकामाच्या कामावरून महेश पुंडलिकराव देशमुख यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी भाग्य नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या महेश देशमुख यांनी सुनील पाटील यांच्याशी किरकोळ बुधवारी सकाळी वाद घातला. नगरसेवक बाळू देशमुख यांच्या निधीतून नालीचे काम कसे काय करता ?,असे म्हणून देशमुख यांनी पाटील यांना मारहाण केली. याप्रकरणी सुनील पाटील यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...