शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

आदर्शबाबत प्रतिक्रियेस नकार



आदर्श घोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला असला तरी त्याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका राहुल गांधी यांचे निकटवर्ती खासदार व केंद्रीय माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मंगळवारी मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांनी बुधवारी नकार दिला. आदर्श संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यावर आपण काही बोलणार नाही, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज यांचे काय?

लोकसभा निवडणुकीपूर्वी पृथ्वीराज यांना दिल्लीत आणण्याचा विचार चालू असल्याचे संकेत राहुल गांधी यांच्या गोटातून मिळत आहेत. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळणार नाही, अशी भावना दिल्लीतील काँग्रेसचे अनेक बडे नेते खासगीत व्यक्त करतात. त्याचवेळी, लोकसभा निवडणूक पाच महिन्यांवर आली असताना चव्हाण यांना दिल्लीत आणण्याची खेळी फारशी परिणामकारक ठरणार नाही, असाही एक मतप्रवाह पक्षात आहे. माणिकराव यांच्या जागी नव्या चेहऱ्याची नियुक्ती अपेक्षित असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांच्या जागी राज्यातील मंत्र्यांना उतरविण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात येत असल्याचे समजते.

सध्याची चर्चा कशावर?

काँग्रेसच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देऊन त्याजागी नवे चेहरे आणणे.

गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेली मंत्रिमंडळातील तीन पदे भरणे.

महामंडळांवरील ​रखडलेल्या नियुक्त्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...