शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३
काँग्रेस 'भाकरी' फिरवणार?
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसची संभाव्य घसरगुंडी थोपवण्यासाठी पक्षात जोरदार खलबते सुरू असून, या पक्षात सरकार पातळीवर ' भाकरी फिरेल ' का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन यांच्यात येथे तीन दिवस चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील खांदेपालट, महामंडळांवरील चार वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या आणि प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल असे उपाय करून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कितपत सज्ज होऊ होईल, याविषयी दिल्लीतील काँग्रेसश्रेष्ठींना शंकाच वाटते आहे. .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...