शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

डॉ. नरेंद्र जाधव यांना पुरस्कार

  डॉ. नरेंद्र जाधव यांना पुरस्कार

अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासह चार साहित्यिकांना खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. इस्लामपूर येथील दिवगंत रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. जानेवारीला श्रीरामपूर येथील काँग्रेस भवनमध्ये पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.

डॉ. नरेंद्र जाधव यांना कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर सदानंद देशमुख (बुलढाणा) यांच्या ' भूईरिंगणी ' या ललित वाङ्मयास , मुबारक शेख (सोलापूर) यांच्या ' दहशतनामा ' या कवितासंग्रहाला , शंकरराव नऱ्हे (पुणे) यांच्या ' रणझुंजार ' या कादंबरीला , तर भाऊराव सोमवंशी (उस्मानाबाद) यांच्या ' वचितांचे दुःख ' या आत्मकथनाला साहित्यिक पुरस्कार देण्यात येणार आहे.

रोख रक्कम , सन्मानपत्र , स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार्थींच्या निवड मंडळात डॉ. कुमार खरात , डॉ. विकास अत्रे , अनील पांडे यांचा सहभाग होता. पुरस्कार वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वेदप्रकाश भोसले , व्यंकटराव पाटील , भगवान जाधव , बन्सीधन पाटील , ज्ञानोबा भंडे , राजकुमार सोमासे , राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...