शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालय सुरु - मोघे

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालय सुरु करण्यात येणार असून येत्या महिनाभरात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नांदेड इथ पत्रकार परिषदेत दिली.पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

एस.सी, एस.टी,ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जात पडताळणी कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यात ही कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी जात प्रमाणपत्र देणार असून संबंधित कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल. या कार्यालयात सी.सी.टि.व्ही कॅमेरे देखील बसविण्यात येणार आहेत.
सामाजिक न्याय विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रम शाळा व वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहूनच संबंधित शाळांना अनुदान वितरीत करण्यात येत आहे. ज्या शाळा, वसतिगृह याची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यांचे अनुदान रोखले जात आहे. असेही मोघे यांनी यावेळी सांगितले.

ई-स्कॉलरशिप योजनेंतर्गत १६ लाख विद्यार्थ्यांना १८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली आहे. इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेत २ लाख ५५ हजार लाभार्त्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.

ओ.बी.सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागील वर्षीचे ८०० कोटी रुपये शिष्यावृत्तीपोती देण्यात आले आहेत. केंद्र सरकार कडून ओ बी सिंकच्या विद्यार्थ्यांना शिष्यावृत्तीपोती १५०० कोटी रुपये येणे आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
१५  ते ३१ डिसेंबर दरम्यान व्यसनमुक्ती निर्धार पंधरवडा साजरा करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...