गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

गर्भ लिंग निदान कायदा


गर्भवती महिलेला किंवा तिच्या नातेवाईकांना किंवा अन्य कोणाही व्यक्तीला तिच्या गर्भाचे लिंग तोंडी सांगणे, थेट किंवा अप्रत्यक्षपणे कळवणे, अन्य मार्गाने सांगणे हा या कायद्याखालील दंडनीय अपराध ठरविण्यात आला आहे. या कायद्याखाली वैद्यकीय व्यावसायिकास तीन वर्ष मुदती पर्यंतचा कारावास आणि किंवा रु. 10 हजार पर्यंत दंड आणि पुढील प्रत्येक अशा अपराधास पाच वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागामार्फत आरोग्याची काळजी घेण्यात येत असली तरी प्रत्येक नागरिकांनी 'इलाजा पेक्षा प्रतिबंध बरा' या सुत्राप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्यही हा विभाग मोठया प्रमाणात करीत असतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या संभाव्य आजाराचे ही निदान होते व प्रतिबंधही होते. प्रत्येकाने आपले आरोग्य नेहमीसाठी तंदुरुस्त राहील याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...