Yojana लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Yojana लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

‘सावकारी’ 'कंपनी' ला फास


‘हरित महाराष्ट्र’ अभियान

राज्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात वन विभागातर्फे सात कोटी रोपे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

बुधवार, १ जानेवारी, २०१४

नवा भूसंपादन कायदा अंमलात


jairamramesh

'जमीन हवी आहे? तुम्ही हवी तेवढी खरेदी करू शकता. तुम्हाला कोणतीही मर्यादा नाही...,' या शब्दांत केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी खासगी उद्योगांच्या मनातील जमीन उपलब्धतेबाबतची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

गर्भ लिंग निदान कायदा


गर्भवती महिलेला किंवा तिच्या नातेवाईकांना किंवा अन्य कोणाही व्यक्तीला तिच्या गर्भाचे लिंग तोंडी सांगणे, थेट किंवा अप्रत्यक्षपणे कळवणे, अन्य मार्गाने सांगणे हा या कायद्याखालील दंडनीय अपराध ठरविण्यात आला आहे. या कायद्याखाली वैद्यकीय व्यावसायिकास तीन वर्ष मुदती पर्यंतचा कारावास आणि किंवा रु. 10 हजार पर्यंत दंड आणि पुढील प्रत्येक अशा अपराधास पाच वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागामार्फत आरोग्याची काळजी घेण्यात येत असली तरी प्रत्येक नागरिकांनी 'इलाजा पेक्षा प्रतिबंध बरा' या सुत्राप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्यही हा विभाग मोठया प्रमाणात करीत असतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या संभाव्य आजाराचे ही निदान होते व प्रतिबंधही होते. प्रत्येकाने आपले आरोग्य नेहमीसाठी तंदुरुस्त राहील याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

फ्लोराईडमुळे फ्लोरोसीस


1.5 पीपीएम पैक्षा जास्त फ्लोराईडची मात्रा असलेले पाणी दीर्घकालापर्यंत पिण्यात वापरल्यास फ्लोरोसीस आजार होतो. यात मुख्यत: शरिरातील हाडावर, दातांवर परिणाम होतो. पिण्याच्या पाण्याबद्दल आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे. पाणीनमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल प्रकाशित करणे. शाळेतील विद्यार्थी व गृहभेटीद्वारे या आजाराचे सर्व्हेक्षण करुन अवश्यक तो औषधोपचार केला जातो. पिण्याच्या पाण्यातील आवश्यकतेपेक्षा जास्त असलेले फलोराईडचे प्रमाण कमी करण्याच्या घरगुती पध्दती विषयी माहिती दिली जाते.

गावातील आरोग्यासाठी आशा


आशा स्वयंसेविकेस 24 दिवसाचे आरोग्यविषयक मुलभूत प्रशिक्षण दर दीड हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे आशा स्वयंसेविका. आशा स्वयंसेविकेस कामावर आधारित मोबदला.

सिकलसेल आजार नियंत्रण


प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सिकलसेल आजाराबाबत खालील सेवा सुविधा उपलब्ध आहेत. मोफत सोल्युबिलिटी चाचणी. इलेक्ट्रोफोरसीस केंद्रावर मोफत इलेक्ट्रोफोरसीस चाचणी. मोफत समुपदेशन. सिकलसेल ग्रस्त रुग्ण (सफरर) व्यक्तीसाठी नियमित आरोग्य तपासणी. सिकलसेल ग्रस्त रुग्ण (सफरर) व वाहक (कॅरीयर) व्यक्तींना गरजेनुसार फॉलीक ऍसिडच्या गोळया, ऍन्टीबायोटिक्स (प्रतिजैविके) तसेच वेदनानाशक (पेनकिलर्स) औषधांचा पुरवठा. रक्तपेढी असल्यास सिकलसेल ग्रस्त रुग्णांना (सफरर) रक्तसंक्रमण सुविधा. एचबी, सीबीसी, रक्तचाचण्यांची सुविधा.

राष्ट्रीय हिवताप निर्मूनल


हिवताप हा डांसामार्फत पसरणारा आजार असून यात रुग्णाला थंडी वाजून ताप येतो. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत घरोघरी सर्व्हेक्षण, रक्त नमुने गोळा करणे, तपासणे व मोफत औषधोपचार करणे तसेच आठवडयातून एकदा सर्वपाणी साठे कोरडे व स्वच्छ करणे, डबकी, नाल्या वाहत्या करणे, पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. कायम स्वरुपी पाणी साठयात गप्पी मासे सोडणे, मच्छरदाणीचा वापर करणे.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन



तीन आठवडे पेक्षा जास्त खोकला येणे, खोकलतांना बेडका पडणे, छाती दुखणे, बारीक ताप, भुक मंदावणे, संशयीत रुग्णांचे मोफत रोगनिदान, निदान झालेल्या रुग्णास मोफत डॉट औषधोपचार. मुख्य म्हणजे डॉट औषधोपचाराने रुग्ण शंभर टक्के बरा होतो. औषधोपचार मध्येच थांबविणे अथवा टाळाटाळ करणे धोकादायक आहे.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम


कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजार लोकसंख्येमध्ये दोन पेक्षा कमी करणे यासाठी आपल्या सहभागाची आवश्यकता आहे. यात तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. फिकट किंवा लालसर रंगांचा उंचावलेला अथवा सपाट न खाजनारा न दुखनारा संवेदनाहीन चट्टा असल्यास न लाजता त्वरीत नजिकच्या दवाखाण्यात तपासणी करुन घ्यावी. आरोग्य शिक्षण देणे, रुग्ण शोधून त्यांचे निदान करणे, मोफत विकृत रुग्णांचे पुनर्वसन बहूविध औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्ण बरा होतो.

कुटूंब कल्याण कार्यक्रम



            या कार्यक्रमांतर्गत पात्र जोडप्यासाठी स्त्री-पुरुष नसबंदी, टाका, बिनटाका शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यात शासकिय अनुदान स्त्री शस्त्रक्रियेसाठी रु. 250 व पुरुष शस्त्रक्रियेसाठी रु. 1 हजार 451 तर बीपीएल, एससी, एसटी खालील स्त्री शस्त्रक्रियेसाठी रु. 600 देण्यात येते. तसेच पाळणा लांबविण्यासाठी तांबी व ओरलपिल्सच्या गोळया, निरोध यांचे वाटप पात्र लाभार्थीना मोफत केले जाते

जीवनदायी आरोग्य योजना


या योजनेत बीपीएल, एपीएल, अंत्योदय व अन्नपुर्णा या योजनेतील ज्या शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न रु. 1 लाखापेक्षा कमी असेल अशा कुटुंबासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली असून यात नोंदणीकृत रुग्णालयातून मोफत तपासण्या, औषधोपचार नि:शुल्क राहणार असून यात 972 उपचार व 121 पाठपुरावा सेवाचा समावेश करण्यात आलेला आहे.

कुपोषण मुक्तीसाठी उपाय


पुरेशा जेवना अभावी येणारी अवस्था म्हणजे कुपोषण. कमी वयातील लग्न, लवकर गर्भारपण यामुळे कुपोषण व कुपोषणामुळे आजारपण व आजारपणामुळे पुन्हा कुपोषण या विभागामार्फत बिगर आदिवासी 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची, गरोदर व स्तनदामाताची तीन महिन्यातून एकवेळेस आरोग्य तपासणी तर आदिवासी भागात महिन्यातून एकवेळेस आरोग्य तपासणी केली जाते. अतितिव्र कुपोषित (सॅम) व मध्यम तीव्र कुपोषित बालकांना (मॅम) ग्रामपातळीवर व्हिसीडीसी व सीटीसी मधून पोषण आहार, आरोग्य तपासणी व औषधोपचार दिला जातो. अंगणवाडीतील बालकांना ह्रदयरोगाशी संबंधीत आजारांवर शासनामार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात.

सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना


सदरील योजना फक्त दारिद्रय रेषेखाली लाभार्थीसाठीच लागू आहे. मुलगा नसता एका मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या जोडप्याना रु. 10 हजार आणि दोन मुली असल्यास प्रत्येक मुलीच्या नावे 5 हजार असे एकूण रुपये 10 हजार प्रमाणपत्राच्या स्वरुपात देय राहील. मात्र त्यांची वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह केलेला नसावा या अटीवर.