' राज्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून ' हरित महाराष्ट्र ' अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात वन विभागातर्फे सात कोटी रोपे लावण्यात येणार आहेत, ' अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
nanded news live लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
nanded news live लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, ११ जानेवारी, २०१४
'बाप'माणसाला 'आप'ची चपराक
राज ठाकरे यांनी उन्मेष जोशी यांच्याबरोबर भागीदारीत दादरची कोहिनूर मिल खरेदी केल्याने त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही , अशी टीका आम आदमी पार्टीचे समन्वयक मयंक गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
दाजीकाका गाडगीळ यांचे निधन
ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ (वय ९९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
दाजीकाका गाडगीळ यांचे निधन
ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संस्थापक अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ (वय ९९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
शुक्रवार, १० जानेवारी, २०१४
मालमत्ताधारकांवर सवलतींचा वर्षाव
नांदेड - मालमत्ताकराच्या नोटिसा मिळाल्यानंतर हवालदिल झालेल्या मालमत्ताधारकांना अखेर प्रशासनाने दिलासा दिला आहे.
मंगळवार, ७ जानेवारी, २०१४
एसटीच्या वाहकाचा गोदावरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
नवीन नांदेड - आयुष्य संपवायचे या निर्धाराने शंभर फुटांपेक्षाही अधिक उंच असलेल्या गोदावरी नदीवरील वाजेगावच्या पुलावरून एकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. विशेष म्हणजे हा दुसरा-तिसरा कोणी नसून, एस. टी. महामंडळाच्या बिलोली आगाराचा वाहक साईनाथ शंकरराव खंडेराय असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (ता. सहा) दुपारी ही घटना घडली.
बिलोली आगाराचे वाहक खंडेराय हे दुपारी दोनच्या सुमारास एसटीने प्रवास करत होते. वाजेगाव पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने एसटी थांबली. अशा स्थितीत खंडेराय यांनी एसटीतून उतरून पुलावरून कठड्यावर चढून गोदावरीच्या पात्रात उडी मारली. हा प्रकार एसटीतील प्रवासी व चालकास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली व काही नागरिक व जीवरक्षक मदतीसाठी धावले. अचानकपणे मरणाला जवळ करण्यासाठी गेलेले खंडेराय मात्र उडी मारूनही पाण्यातून वाचले, हे विशेष ! एवढ्या मोठ्या उंचीवरून उडी मारून नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले खरे; परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. खंडेराय हे बिलोली आगाराचे वाहक आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी त्यांची एसटी तपासली, या कारणावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळाला नाही. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोमवार, ६ जानेवारी, २०१४
माळेगाव यात्रेत 90 कोटींची उलाढाल
माळेगाव यात्रेत आजवर जवळपास 80 ते 90 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. ही यात्रा अनेक वैशिष्ट्यांनी जशी नटली आहे, तशीच ती व्यापारी व ग्राहकांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे.
रविवार, ५ जानेवारी, २०१४
Please Give Suggestion for AAM AADMI PARTY NANDED.

Please Give Suggestion for
AAM AADMI PARTY NANDED.
प्रिय मित्रांनो,
मी आनंद कल्याणकर,
२५-३० वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,विकासात्मक
कार्यात सहभागी आहे.
हे आपणास माहितीच आहे.
जातीयवादाचा आणि भ्रष्टाचाराचा धुमाकूळ पहाता या गोष्टींना संपविण्याची
विचार सरणी आणि सामान्य माणसांच्या विकासाची भूमिका घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे काम
करू इच्छितो.
आपण कमेंट मध्ये YES व प्रतिक्रिया द्यावी.
Mr.Anand Kalyankar.
https://www.facebook.com/anandrao.kalyankar
गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची मंगळवारी जयंती.
शीख पंथांचे १०वे गुरु श्री. गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची येत्या मंगळवारी जयंती असून या निमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी नांदेड-वाघाळा शहर महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री.किशोर यादव यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
शनिवार, ४ जानेवारी, २०१४
समस्यांची तक्रार करायचीय, नंबर फिरवा
विविध
समस्यांनी ग्रासलेल्या नांदेडच्या जनतेला महापालिकेने
नवी वर्षाची
गिफ्ट दिली
असून, समस्या
सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारे
तक्रार निवारण
केंद्र सुरू
करण्याचा निर्णय
महापालिकेने घेतला आहे.
मंत्रिमंडळात आज ‘आदर्श’ निर्णय?
कुलाब्यातील
आदर्श टॉवर
घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल फेटाळण्याचा
यापूर्वीचा निर्णय काँग्रेस उपाध्यक्ष राहुल
गांधी यांच्या
आदेशावरून, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागे घेतला जाणार
आहे. मात्र
आयोगाच्या अहवालावर
अनिल कपूर बनवणार ‘नायक २’
देशाच्या राजकारणात नवे नायक म्हणून पुढे आलेल्या 'आम आदमी पक्षा'चे अरविंद केजरीवाल यांची भुरळ 'फिल्मी' नायक अनिल कपूर यालाही पडली आहे. 'नायक' चित्रपटात एका दिवसाच्या 'क्रांतिकारी' मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणारा अनिल कपूर केजरीवालांच्या यशाला सलाम म्हणून नायकचा सिक्वेल बनविण्याच्या तयारीला लागला आहे.
बुधवार, १ जानेवारी, २०१४
हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द
भारताने ऑगस्टावेस्टलँड कंपनीशी केलेला ३६०० कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला. केंद्र सरकारने व्हिआयपींसाठी बारा हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने करार रद्द केला.
रविवार, २९ डिसेंबर, २०१३
रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी
जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती देऊन ही कामे त्वरित पूर्ण करावीत, असे आदेश पालकमंत्री यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत असून यासाठी इच्छूक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जी.एस.पडवळ यांनी केले आहे.
विविध देशानी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, त्याचा केलेला अवलंब, त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय तसेच संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी शासन निर्णयानुसार अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याची योजना मंजुर करण्यात आली आहे. युरोप, द. अफ्रिका, द. अशिया, द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड, सिंगापूर इत्यादी देशांमध्ये अभ्यास दौऱ्याचे नियोजन आहे.
यासाठी 1 लाख 30 हजार ते 2 लाख 5 हजार खर्च अपेक्षित असून राज्यशासनाकडून खर्चाचे 50 टक्के किंवा रु. 1 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
दौऱ्यासाठी शेतकरी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्याचे स्वत:चे नावे वैध पारपत्र जे दौरे निघण्यापूर्वी 6 महिने मुदत असलेला असावा. शेतकऱ्यांचे स्व:ताचे नावे शेत जमिन नोंद असलेला सातबारा, आठ अ असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन प्रामुख्याने शेती असावे. शेतकऱ्याचे वय 21 ते 62 वर्षाच्या दरम्यान असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय संस्थेत नौकरीस नसावा. शेतकरी यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या विभागामार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. परदेश दौऱ्यास जाण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संसर्ग जन्य रोगाची लागण झालेले नसावे. शासकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जी.एस.पडवळ यांनी केले आहे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)