राज ठाकरे यांनी उन्मेष जोशी यांच्याबरोबर भागीदारीत दादरची कोहिनूर मिल खरेदी केल्याने त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही , अशी टीका आम आदमी पार्टीचे समन्वयक मयंक गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
आपल्या मुलांना इंग्रजी शाळांत घालायचे आणि मराठी भाषेचा आग्रह धरायचा अशी दुटप्पी भूमिका आमची नाही , असा टोलाही गांधी यांनी लगावला.
महाराष्ट्रात ' आप ' नसून मनसेच बाप आहे या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना गांधी म्हणाले की ,राज हे नेहमीच पातळी सोडून टीका करतात. त्यांच्या इतकी हीन पातळी गाठणे आम्हाला शक्य नाही. परंतु आम आदमी पार्टी व भ्रष्टाचार याबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपला पक्ष आई असल्याचे जे वक्तव्य केले आहे त्याचाही गांधी यांनी समाचार घेतला. जो राष्ट्रवादी काँग्रेस केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी जन्माला आला आहे. शरद पवार , अजित पवार व छगन भुजबळ यांच्यासारखे भ्रष्टाचाराचे आयकॉन पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पक्षाने आपल्याला महाराष्ट्रातील आई म्हणून घेतल्याने आपली मान शरमेने खाली गेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...