रविवार, ५ जानेवारी, २०१४
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सत्तेसाठी फिक्सिंग
शिवसेना , भाजपा , काँगेस , राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकाच नाण्याच्या बाजू असून सत्तेसाठी त्यांचे फिक्सिंग झाले आहे. आमचा पक्ष राज्यात तिसरा पर्याय म्हणून पुढे येत असल्याने सत्ताधारी पक्ष माझ्या भाषणावर बंदी घालीत आहेत ,' असा आरोप ऑल इंडिया मजलिस ए मुसलमीन (एमआयएम) चे अध्यक्ष खासदार असोद्दिन ओवेसी यांनी केला. सिल्लोड नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी खासदार ओवेसी यांची गुरूवारी सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन , प्रदेश उपाध्यक्ष मुजाहीदखान , जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी , जिल्हा उपाध्यक्ष फैसन खान , जिल्हा सरचिटणीस सय्यद मेहराज यांच्यासह सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
' मुस्लिम समाज स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसच्या पाठिशी आहे. मात्र काँग्रेसने मुस्लिमांना काय दिले ? ८५ टक्के मुस्लिम समाज दारिद्रय रेषेखालील जीवन जगत आहेत. फक्त दोन टक्के मुस्लिम पदवीधर आहेत. समाजाच्या न्याय हक्कासाठी पोटतिडकीने भाषण केले तर , मला भडकाऊ भाषण दिले म्हणून रोखले जात आहे. गुन्हे दाखल असलेल्या महाराष्ट्रातील आमदार- खासदारांना का रोखत नाहीत ? येथील मुस्लिम तरूणांवर दहशतवादाचा ठपका बसला असून अनेक निरपराध तरूणांना चौकशीला समोरे जावे लागत आहे. अनेकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे , हे कोठेतरी त्यामुळे हे कोठेतरी थांबणे गरजेचे आहे ,' असे खासदार ओवेसी म्हणले.
धुळ्यात दंगल झाली तेव्हा मुस्लिम समजातील आमदार अब्दुल सत्तार यांनी तेथील नागरिकांसाठी काय केले ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तालुकाध्यक्ष अॅड. अनिस अहेमद यांनी सुत्रसंचलन केले. शहराध्यक्ष हाजी राजुमियाँ देशमुख यांनी आभार मानले. सभेला मोठी गर्दी झाली होती.
आता पुतळा का उभारता
भारतातील नागरिकांना खायला अन्न नसताना देशाचे भावी पंतप्रधान म्हणवणारे नरेंद्र मोदी कोट्यवधी रूपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारत आहेत. उत्तर प्रदेशात व इतरत्र इतर नेत्यांनी पुतळे उभारले तेव्हा मोदी व भाजप नेत्यांनी विरोध केला. मग आता तुम्ही कशासाठी पुतळा उभारत आहात , असा प्रश्न खासदार ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...