nanded live लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
nanded live लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

‘हरित महाराष्ट्र’ अभियान

राज्यातील वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात वन विभागातर्फे सात कोटी रोपे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

पत्रकारांना घडवणारे संपादक प्रभाकरराव रावके



मालमत्ताधारकांवर सवलतींचा वर्षाव

नांदेड - मालमत्ताकराच्या नोटिसा मिळाल्यानंतर हवालदिल झालेल्या मालमत्ताधारकांना अखेर प्रशासनाने दिलासा दिला आहे. 

ग्रामीण भागातील स्नेहलची 'गुगल' भरारी!


तहसीलदार गर्तेत राहतो चिंता 'वॉट्‌सअप'वर वाहतो

नांदेड - निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निव्वळ लोकानुनय करणाऱ्या शासकीय योजनांचा भडिमार आणि अंमलबजावणीचा कालावधी अत्यंत तोकडा शिवाय निकषही स्पष्ट नाहीत. या परिस्थितीत कायम कामाच्या गर्तेत असलेली तहसीलदार मंडळी, त्यांना भेडसावणारे प्रश्‍न, चिंता "वॉट्‌सअप'वर एकमेकांशी शेअर करताना दिसत आहेत.

मी सध्या मुंबईमध्येच; काही घडले तर सांगेनच

नांदेड - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठविल्यानंतर आपण मुंबईतच आहोत. दिल्लीसह कुठेही गेलेलो नाही. काही घडले तर सांगूच की, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 9) बोलताना व्यक्त केली. 

मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

पोलिसांच्या माथी अपयशाचं खापर


एसटीच्या वाहकाचा गोदावरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

नवीन नांदेड - आयुष्य संपवायचे या निर्धाराने शंभर फुटांपेक्षाही अधिक उंच असलेल्या गोदावरी नदीवरील वाजेगावच्या पुलावरून एकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. विशेष म्हणजे हा दुसरा-तिसरा कोणी नसून, एस. टी. महामंडळाच्या बिलोली आगाराचा वाहक साईनाथ शंकरराव खंडेराय असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (ता. सहा) दुपारी ही घटना घडली. 

बिलोली आगाराचे वाहक खंडेराय हे दुपारी दोनच्या सुमारास एसटीने प्रवास करत होते. वाजेगाव पुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने एसटी थांबली. अशा स्थितीत खंडेराय यांनी एसटीतून उतरून पुलावरून कठड्यावर चढून गोदावरीच्या पात्रात उडी मारली. हा प्रकार एसटीतील प्रवासी व चालकास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली व काही नागरिक व जीवरक्षक मदतीसाठी धावले. अचानकपणे मरणाला जवळ करण्यासाठी गेलेले खंडेराय मात्र उडी मारूनही पाण्यातून वाचले, हे विशेष ! एवढ्या मोठ्या उंचीवरून उडी मारून नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले खरे; परंतु त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. खंडेराय हे बिलोली आगाराचे वाहक आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी त्यांची एसटी तपासली, या कारणावरून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळाला नाही. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MIM, युतीपासून सावध राहा!

एमआयएम पक्षाची सभा म्हणजे 'निवडणूक गल्लीची आणि घोषणा दिल्लीची' असा प्रकार आहे.

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

माळेगाव यात्रेत 90 कोटींची उलाढाल

 माळेगाव यात्रेत आजवर जवळपास 80 ते 90 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. ही यात्रा अनेक वैशिष्ट्यांनी जशी नटली आहे, तशीच ती व्यापारी व ग्राहकांसाठी एक मोठी बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे.

रविवार, ५ जानेवारी, २०१४

Please Give Suggestion for AAM AADMI PARTY NANDED.



Please Give Suggestion for
AAM AADMI PARTY NANDED.

प्रिय मित्रांनो,
मी आनंद कल्याणकर,
२५-३० वर्षांपासून पत्रकारिता, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,विकासात्मक कार्यात सहभागी आहे.
हे आपणास माहितीच आहे.
जातीयवादाचा आणि भ्रष्टाचाराचा धुमाकूळ पहाता या गोष्टींना संपविण्याची विचार सरणी आणि सामान्य माणसांच्या विकासाची भूमिका घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे काम करू इच्छितो.

आपण कमेंट मध्ये YES व प्रतिक्रिया द्यावी.

Mr.Anand Kalyankar.
Mobile : 9765 000 800.

https://www.facebook.com/anandrao.kalyankar

माळेगाव यात्रेतील खंडोबारायाची शासकीय पूजा ?

 Vitthal Rukmini God
पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजा केली जाते त्या प्रमाणेच नांदेड मधील माळेगाव यात्रेतील खंडोबारायाची शासकीय पूजा करण्यात यावी, अशी मागणी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी माळेगाव यात्रेत आयोजित निर्धार परिषदेत केली.या परिषदेचे उदघाटन माजी आमदार भाई ज्ञानोबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.

गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची मंगळवारी जयंती.

 Guru Gobind Singh ji
शीख पंथांचे १०वे गुरु श्री. गुरुगोविंद सिंघजी महाराज यांची येत्या मंगळवारी जयंती असून या निमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी नांदेड-वाघाळा शहर महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री.किशोर यादव यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

समस्यांची तक्रार करायचीय, नंबर फिरवा



विविध समस्यांनी ग्रासलेल्या नांदेडच्या जनतेला महापालिकेने नवी वर्षाची गिफ्ट दिली असून, समस्या सोडविण्यासाठी २४ तास उपलब्ध असणारे तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

कचरा फेकणा-यांवर नांदेडमध्ये कारवाई



खाद्यपदार्थांचा कचरा नाली आणि रस्त्यावर फेकणाऱ्या चार खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून महापालिकेने आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. स्वच्छता आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी ही कारवाई केली. महापालिकेने कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणाऱ्यांवर ही कारवाई सुरू केली असून, यापुढेही ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.