बुधवार, ८ जानेवारी, २०१४

मालमत्ता कराच्या विरोधात सत्ताधारी, विरोधक एकवट !


नांदेड महापालिकेच्या वतीने मालमत्ताधारकांना लावण्यात आलेल्या कराबाबत तक्रारी आल्यानंतर आता सत्ताधारी त्याचबरोबर विरोधकही एकवटल्याचे चित्र आहे. मालमत्ता करासंदर्भात लावण्यात आलेली शास्ती रद्द करावी, अशी मागणी सत्ताधारी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली. विरोधकांतर्फे शिवसेनेने मालमत्ता कर कमी करावा, अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना बुधवारी (ता. आठ) सादर केले. 

नांदेड महापालिकेतर्फे मालमत्ताधारकांना मूल्यांकन पद्धतीनुसार नव्याने मालमत्ता कर लावला असून, त्याबाबतची मागणी बिलेही देण्यात आली आहेत. याबाबत काही मालमत्ताधारकांनी पदाधिकारी, नगरसेवक त्याचबरोबर पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस त्याचबरोबर विरोधक असलेल्या शिवसेनेतर्फेही मालमत्ता करासंदर्भात निवेदन देऊन मालमत्ताधारकांच्या मागण्यांसंदर्भात विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...