एमआयएम पक्षाची सभा म्हणजे 'निवडणूक गल्लीची आणि घोषणा दिल्लीची' असा प्रकार आहे.
एमआयएम पक्ष अल्पसंख्यांकाच्या हिताचा नसून धोक्याचा आहे. एमआयएम, भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांसारखे जातीयवादी पक्ष देशाच्या एकतेसाठी घातक असून, केवळ सत्तेसाठी भूलथापा देण्याचे राजकारण करतात, असा आरोप आमदार अब्दल सत्तार यांनी केला आहे.
नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी बिलाल नगरमध्ये आयोजित सभेत त्यांनी ही टीका विरोधकांवर केली. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष गणेश दौड, शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगरसेवक शांतीलाल अग्रवाल, रऊफ बागवान, नंदकिशोर सहारे, अनिल बोरा, अब्दुल सत्तार हुसेन, दादाराव पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सत्तार म्हणाले, 'सैलानी येथे हजारो हिंदू बांधव दर्शनासाठी येतात तर, हजारे मुस्लिम बांधव श्री म्हसोबा व श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये जातात म्हणून त्यांचा धर्म बाटला का? विविध धर्मिक सणामध्ये दोन्ही समाजाचे नागरिक एकत्र येऊन शुभेच्छा देतात. त्यामुळे ते धर्मांतरित होत नाहीत. जातीपातीच्या राजकारणाला थारा देऊ नका.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...