रविवार, १२ जानेवारी, २०१४
फ्रान्सच्या अध्यक्षांचे अफेअर
फ्रेंच साप्ताहिकाने केला गौप्यस्फोट
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉईस ओलांद यांचे अभिनेत्री ज्युली गेट हिच्याबरोबर 'अफेअर' सुरू होते, असे खळबळजनक वृत्त घेऊन 'क्लोजर'चा शुक्रवारचा विशेष अंक बाजारात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ओलांद यांच्या 'अफेअर'बाबत फक्त चर्चा सुरू होती. पण 'क्लोजर'ने थेट दोघांचा एकत्रित फोटोच प्रसिद्ध करून चर्चेला आणखी तडका दिला आहे.
'क्लोजर'चा अंक बाजारात आल्यानंतर उलटसुलट चर्चेला वेग आला आहे. अध्यक्ष ओलांद यांनी 'क्लोजर'वर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला असून, ही बातमी म्हणजे माझ्या खासगी आयुष्यावर करण्यात आलेला हल्ला आहे. जसे प्रत्येक माणसाला वैयक्तिक आयुष्य असते. तसेच मलाही आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची कुणीही आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
क्लोजर हे अनेकदा पॅरिसमध्ये असताना स्कूटरवरून त्यांच्या मैत्रिणीकडे जातात आणि ते बऱ्याच रात्री मैत्रीण ज्युली गेट हिच्या घरी घरीच असतात. ३१ डिसेंबरच्या रात्रीही ओलांद यांनी नव्या वर्षाचे स्वागत गेट हिच्या घरीच केले, असा दावा 'क्लोजर'ने केला आहे.
गेट ही ४१ वर्षांची असून तिच्या आणि अध्यक्षांच्या 'अफेअर'ची चर्चा काही महिन्यांपासून जोरदार सुरू आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...