देशाच्या राजकारणात नवे नायक म्हणून पुढे आलेल्या 'आम आदमी पक्षा'चे अरविंद केजरीवाल यांची भुरळ 'फिल्मी' नायक अनिल कपूर यालाही पडली आहे. 'नायक' चित्रपटात एका दिवसाच्या 'क्रांतिकारी' मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणारा अनिल कपूर केजरीवालांच्या यशाला सलाम म्हणून नायकचा सिक्वेल बनविण्याच्या तयारीला लागला आहे.
काँग्रेस, भाजपसारख्या बड्या पक्षांना धूळ चारून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या केजरीवाल यांनी सध्या देशाचे राजकीय अवकाश व्यापले आहे. उद्योगपती, समाजसेवकांसह बॉलिवुडही केजरीवाल यांच्या यशाने हरखून गेले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या नायक या चित्रपटात अनिल कपूर याने एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याची भूमिका केली होती. 'नायक'मधील हा मुख्यमंत्री भ्रष्टाचाराविरोधात लढतो, गुन्हेगारांना तुरुंगात टाकतो, असे दाखविण्यात आले होते.
केजरीवाल यांचा वास्तव जीवनातील प्रवास 'नायक' चित्रपटातील घडामोडींपेक्षाही थरारक आणि संघर्षमय आहे. केजरीवाल यांची वाटचाल पाहून अनिल कपूर यांच्या मनात 'नायक २'चे विचार घोळू लागले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल काय-काय करतील याचे चित्रण या चित्रपटात असेल असे सांगण्यात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...