शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३
पर्यटन विकासाचा आराखडा तयार करावा-पालकमंत्री
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यात श्री.क्षेत्र माळेगाव यात्रा पर्यटनाच्या दृष्टीनही महत्वाची असून त्यासाठी पर्यटन विकासाचा ५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा असं जिल्ह्याचे पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी प्रशासनाला सुचित केलं आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी माळेगाव यात्रेला सुरुवात होणार आहे.
पालकमंत्री सावंत यांनी काल नांदेड इथ या यात्रेच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मालेगावातील पाणी पुरवठ्याच्या आणि विकासाच्या योजनांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितलं. मद्य विक्री बंदीचा निर्णय यात्रेदरम्यान कडकपणे राबविला जाईल. त्यासाठी पोलिस प्रशासनान विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...