नांदेड : नायगाव पंचायत
समिती कार्यालयात गुरूवारी ५२ कर्मचार्यांपैकी केवळ १५ कर्मचारी उपस्थित
आढळून आल्याची बाब जि. प. सदस्य संजय बेळगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी
सुमंत भांगे यांच्या निदर्शनात आणून दिली आहे.
पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
याबाबत त्यांनी तक्रार केली
असून कारवाईची मागणी केली आहे.
गुरूवारी बेळगे हे पंचायत समिती
कार्यालयात गेले असता ५२ कर्मचार्यांपैकी १५ कर्मचारी कार्यालयात उपस्थित
होते. उर्वरित ३७ कर्मचारी अनुपस्थित आढळले. ४ कर्मचार्यांच्या रजा
असल्याचे सांगण्यात आले असले तरी हजेरीपटावर त्याबाबत कोणतीही नोंद घेण्यात
आली नव्हती. बेळगे यांनी कार्यालयात उपस्थित कर्मचार्यांची स्वाक्षरीनिशी
यादी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर केली आहे.
दरम्यान, याबाबत
नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रहाटीकर यांच्याशी संपर्क साधला
असता तीन कर्मचारी अनधिकृतरित्या गैरहजर असल्याची बाब मान्य केली आहे. तर ८
कर्मचारी दुपारी उशिरा कार्यालया आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात
संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे रहाटीकर यांनी
स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी सुमंत भांगे यांनीही या प्रकरणाचा अहवाल
मागविला आहे.
अनधिकृत गैरहजर राहणार्या कर्मचार्यांच्या शोधासाठी एक विशेष पथक स्थापन केले होते. ते पथक सध्या कार्यरत नसल्याचे दिसत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...