"मॉर्गन स्टॅन्ले' ही जगातील प्रमुख "इन्व्हेस्टमेंट बॅंक्स'पैकी एक बॅंक
आहे. त्यांनी भारतातील 200 मोठ्या कंपन्यांचा गुंतवणुकीच्यादृष्टीने सखोल
अभ्यास केला. त्या कंपन्यांची 14 निकषांवर परीक्षा केली. उदा. विक्रीमधील
वाढ, नफ्याचे प्रमाण, पीई रेशो, डिव्हिडंड यिल्ड, डेट-इक्विटीचे प्रमाण,
"ईपीएस'मधील वाढीचा दर, भांडवलावरील परतावा, "एफआयआय'चा कंपनीतील हिस्सा,
शेअरमधील उलाढाल या सर्व निकषांवर चांगली कामगिरी करणाऱ्या "टॉप ट्वेंटी'
कंपन्या स्थानानुसार अशा -
1) पेज इंडस्ट्रीज, 2) बॉश, 3) इन्फोसिस, 4) श्रीराम सिटी युनियन, 5) क्रिसिल, 6) बजाज ऑटो, 7) आयटीसी, 8) टीसीएस, 9) एनएमडीसी, 10) ऑइल इंडिया, 11) सन फार्मा, 12) करूर वैश्य बॅंक, 13) एचडीएफसी बॅंक, 14) एशियन पेंट्स, 15) श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, 16) इमामी, 17) एम अँड एम फायनान्शियल, 18) नेस्ले, 19) कॅडिला, 20) विप्रो.
छोट्या गुंतवणूकदारांना कंपन्यांचा सखोल अभ्यास स्वतः करणे शक्य नसल्याने ते वरील कंपन्यांपैकी आपल्या आवडीच्या 5 ते 10 कंपन्यांचा पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे बनवू शकतात.
1) वरील यादी, कंपन्यांच्या "रॅंक'प्रमाणे बनविलेली असल्याने शक्यतो वरचा क्रमांक असलेल्या कंपन्यांना प्राधान्य द्यावे.
2) आपली गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागून ठेवावी.
3) सर्व खरेदी आत्ताच न करता, बाजारामध्ये "करेक्शन' येण्याची वाट पाहावी.
4) शेअरचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीजवळ आल्यास थोडीफार खरेदी करावी.
5) भाव काही कारणाने गेल्या वर्षभरातील नीचांकी पातळीजवळ आल्यास अजून खरेदी करावी.
6) वरीलप्रमाणे "मार्केट टायमिंग' जमणार नसल्यास, आपल्या आवडत्या शेअरमध्ये "स्टॉक एसआयपी' सुरू करावी.
"मॉर्गन स्टॅन्ले'च्या मते, वरील 20 शेअर पुढील 10 वर्षांत सातत्याने चांगला परतावा देऊ शकतील, तेव्हा, चला बनवूया "दर्जेदार पोर्टफोलिओ!'

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...