गेल्या काही वर्षापासून
सोशल नेटवर्किंग म्हणजे फक्त टाइमपास राहिलेला नाही. याच वर्षात फेसबुकने
अनेक भारतीय तरुणांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या दिल्या. येणाऱ्या वर्षातही
या क्षेत्रात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. २०१४ मध्ये सोशल
नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये नवीन सहा प्रोफाईल्ससाठी खूप मागणी निर्माण
होणार आहे. सोशल नेटवर्किंगचा वाढता पसारा पाहता गलेलठ्ठ पगाराच्या या
नोकऱ्या पटकाविण्याची संधी तरुण-तरुणींना असेल.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेनश (एसईओ) स्पेशॅलिस्ट
सर्च इंजिन्समध्ये सर्च केल्यावर आपली साइट प्राधान्याने दिसावी यासाठी
तज्ज्ञ काम करत असतात. वेबसाइट अॅनलाइझ करणे, मार्केटिंगची तंत्रे तसेच
साइटवर नवीन माहिती अपडेट करण्याचे काम असते. बॅचलर्स डिग्री, तीन वर्षाचा
वेबसाईटशी संलग्न अनुभव असणाऱ्यांना चांगली संधी आहे. एचटीएमएल, सीएए आणि
ब्लॉगिंग तुमच्यासाठी प्लस पॉईंट ठरु शकते.
वार्षिक पगार - ४० लाख (अंदाजे)
सोशल मीडिया स्ट्रॅटजिस्ट
कंपनीसाठी पब्लिक प्रोफाईल तयार करणे तसेच सोशल नेटवर्किंग साइटच्या
मदतीने कंपनी आणि ग्राहकांमध्ये मध्यस्थीचे काम करणे हे यांचे मुख्य काम.
जितके जास्त फॉलोअर्स तितके प्रोडक्ट आणि कंपनी प्रसिद्ध अशा साध्या
गणितावर हे काम चालते. बॅचलर्स डिग्री, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये दोन
वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना या प्रोफाइलमध्ये काम मिळू शकते.
वार्षिक पगार - ३७ लाख (अंदाजे)
ऑनलाइन कम्युनिटी मॅनेजर
कंपनी आणि ऑनलाइन कम्युनिटी (सोशल नेटवर्किंग, मेसेज बोर्डस, इमेल
ग्रूप)मधील संवाद साधणारा दुवा म्हणजे ऑनलाइन कम्युनिटी मॅनेजर. जेव्हा एका
प्लॅटफॉर्मवर एकाच आवड असणारे अनेक लोक एकत्र येतात तेव्हा कंपन्यांना
आपल्या उत्पादनांबद्दल जाहिरात करण्याची सर्वात चांगली संधी असते आणि ही
संधी साधण्याचे काम मॅनेजरला करावे लागते. त्यासाठी क्रिएटीव्ह, व्यवसायिक
दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. बॅचलर्स डिग्री, दोन वर्षांचा बिझनेस
सेटिंगमधील अनुभव असणा-यांना चांगली संधी आहे. फोटोशॉप, व्हिडीओ एडिटींग
आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
वार्षिक पगार - ३५ ते ५० लाख रुपये (अंदाजे)
सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर
सोशल मीडिया मार्केटिंग सांभाळणे तसेच साइटच्या डिझायनिंगवर खास लक्ष
देण्याचे काम पाहण्याची मुख्य जबाबदारी या प्रोफाईलवरील व्यक्तीला पार
पाडावी लागते. जास्तीत जास्त लोकांना आपल्या साईटवर आणण्याचे मुख्य
उद्दिष्ट्य या लोकांसमोर असते. बॅचलर्स डिग्री (एमबीए असल्यास उत्तम), कमीत
कमी पाच वर्षांचा डिजीटल मार्केटिंगमधील अनुभव, चांगले लेखन आणि संवाद
कौशल्य तसेच सोशल मीडियाचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना चांगली संधी आहे.
वार्षिक पगार - २० ते ३४ लाख रुपये (अंदाजे)
सोशल मीडिया मार्केटिंग कोऑर्डिनेटर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगला प्रतिसाद मिळेल अशी खास माहिती
पुरवण्याचे काम कॉर्डिनेटर करतात. यामध्ये खास लेख, माहिती, फोटो,
व्हिडीओचा प्रमुख्याने समावेश असतो. यामध्ये सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर,
लिंकड्इन, गुगल प्लस,पिनट्रेस इत्यादी) साईट्सवर पोस्ट अपडेट करण्यासाठी
तासनतास ऑनलाइन रहावे लागते. यासाठी चांगले लेखन आणि संवाद कौशल्य हवे.
ब्लॉगिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हिडीओ एडिटींगचे ज्ञान असल्यास तो
तुमच्यासाठी तो प्लस पॉइंट ठरेल.
वार्षिक पगार - २० ते २८ लाख (अंदाजे)
ब्लॉगर किंवा सोशल मीडिया कॉपी रायटर्स
आपली ऑनलाइन अस्तित्व दाखवण्यासाठी अनेक कंपन्यांना ब्लॉगर आणि कॉपी
रायटर्सची गरज आहे. लोकांना आपल्या साईटकडे वळवण्यासाठी ब्लॉगर्सची
कंपन्यांना गरज असते. ब्लॉग पोस्ट, सोशल मीडिया नेटवर्क, मेसेज
बोर्डसमार्फत लोकांना आपल्या साईटवर खिळवून ठेवण्याबरोबरच नवीन वाचक आणि
फॉलोअर्स जोडण्याचे मुख्य काम ब्लॉगर्सना करावे लागते. यासाठी चांगली
लेखनशैली, वाचन आणि ताज्या घटनांबद्दल अपडेट असणे गरजेचे आहे.
वार्षिक पगार - २५ ते २६ लाख (अंदाजे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...