मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

नववर्षाच्या प्रारंभाला भावसार चौकात श्रीमद्भभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन


नांदेड - तरोडा खुर्द भागात नववर्षाच्या प्रारंभाला श्रीमदभागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आल आहे. येत्या 1 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हा सोहळा भावसार चौकातील शास्त्रीनगरात आयोजीत केला आहे
    कथा प्रवक्ते म्हणून बीडचे ... .पु. भागवताचार्य श्री नवनाथ महाराज फुटाणे यांच्या सुमुधुर वाणीतुन कथा वाचन होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वश्री हभप नाना महाराज कवडे,कोमल पोपटे, श्रीराम महाराज शिंगारे, निशीकांत महाराज, उद्धव जाधव, हरी पंडित जाधव, अश्विन महाराज, नारायण राउत आदी राज्यभरातील मान्यवरांची संगीत साथ असणार आहे. या सोहळ्याचा प्रारंभ बुधवारी श्रीमदभागवत महात्म मंगला चरणाने होईल. दुपारी तीन ते सायंकाळी सातच्या दरम्यान कथावाचन होईल. त्यासाठी शास्त्रीनगरमध्ये मोठ्या सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
           
भावसार चौकातिल भक्तगणाच्या वतीने आयोजीत या सोहळ्याचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. सात दिवस चालना-या या सोहळ्याचा समारोप आठ जानेवारी रोजी होणार आहे. आठ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघेल, त्यानंतर काल्याचे कीर्तन होईल अन श्रीमद्भभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा समारोप होईल. शहरातील दूर असना-या भाविकांच्या सोयीसाठी स्थानीक केबलवर या भागवत सप्ताहाचे केबलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या भागवत कथेचा सर्व भाविक भक्तानी लाभ घ्यावा अस आवाहन संयोजक राजु यादव यांनी केल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...