http://weeklymarathiswarajya.blogspot.in |
चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर हादरलेल्या काँग्रेसनं, 'आम आदमी'साठी सवलतीच्या सिलिंडरची संख्या १२ करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्याची कुणकुण नुकतीच लागली होती. सध्या सर्वसामान्यांना वर्षभरात सबसिडीचे नऊ गॅस सिलिंडर दिले जातात. त्याऐवजी आता १२ सिलिंडर मिळतील, या विचारानंच मध्यमवर्गीय सुखावले होते. परंतु, या निर्णयाची घोषणा होण्याआधीच तेल कंपन्यांनी, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 'सिलिंडर स्फोट' घडवला आहे.
घरगुती ग्राहकांना नऊ अनुदानित सिलिंडरनंतर दिला जाणारा 'दहावा' सिलिंडर २२० रुपयांनी महाग झाल्याचं तेल कंपन्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे सध्या १०२१ रुपयांना मिळणारा 'दहावा' सिलिंडर आता १२४१ रुपयांना घ्यावा लागणार आहे. अर्थात, वेगवेगळ्या राज्यांमधील स्थानिक कर किंवा व्हॅटनुसार या किंमतीत थोडाबहुत फरक पडणार आहे.
तेल कंपन्यांच्या या घोषणेनंतर आता सबसिडीच्या १२ सिलिंडरचा निर्णय कधी एकदा होतो, असं सामान्यांना वाटू लागलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेसला हा निर्णय घ्यावाच लागेल, असं दिसतंय. तो जनतेसाठी निश्चितच दिलासादायक ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...