गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

महापालिकेची हद्दवाढ करून गावठाण क्षेत्रात समावेश करा

नांदेड - महापालिकेची हद्दवाढ करून गावठाण क्षेत्रात समावेश करा, अशी आग्रही मागणी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

महापालिकेने यावर्षीच्या मालमत्ता कराच्या नोटिसीमध्ये करआकारणी करताना नव्यानेच अकृषिक कराचाही समावेश केला आहे. त्याचबरोबर पालिकेनेदेखील यंदाच्या वर्षी राज्य शासनाच्या आदेशानुसार करआकारणी लागू केल्यामुळे त्यात वाढही झाली आहे. त्यामुळे मालमत्ता करवाढ आणि अकृषिक कराचा समावेश यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून त्याची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. सध्या महापालिकेमध्ये नागरिक गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करत असल्यामुळे पूर्वीप्रमाणेच महसूल विभागास अकृषिक कराच्या वसुलीचे काम देण्यात यावे. तसेच पूर्वीच्या मालमत्ता कराच्या आकारणीमध्ये व सध्याच्या करआकारणीमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्याचाही विचार करून नागरिकांना मालमत्ता कराच्या सुधारित नोटिसा द्याव्यात, अशी मागणीही आमदार पोकर्णा यांनी निवेदनात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...