नवीन नांदेड - महापालिकेच्या सिडकोतील विविध प्रभागांत नागरी सुविधा मिळत
नसल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस व
राष्ट्रवादी कॉंग्रेस हे मित्रपक्षही विकासकामात एकत्र दिसून येत नसल्याने
सत्तेत असूनही सिडकोतील विकासकामासाठी लोकप्रतिनिधींनाच मोर्चाचे हत्यार
उपसावे लागत आहे.
दरम्यान, सिडकोतील ड्रेनेज, पाणीपुरवठा यासाठी महापालिकेने जेएनएनयूआरएमअंतर्गत 53 कोटींचे काम हाती घेतले आहे. या कामाला मुहूर्त केव्हा लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर सार्वत्रिक निवडणुकीनंतर सिडकोत नगरसेवकांना काहीही काम मिळाले नाही. त्यामुळे ही हतबल झाले आहेत.
सिडकोमध्ये महापालिकेच्या वतीने आजपर्यंत कोणताही विकासाचा कृतिबद्ध आराखडा तयार करण्यात आला नाही. सत्ताधारी नगरसेवकांत एकमत नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्ती कमी पडत आहे. केवळ अधिकाऱ्यांना दमदाटी करून किरकोळ कामे नगरसेवक करून घेत आहेत. ज्या सोयीसुविधा सार्वजनिक स्वरूपात मिळायला पाहिजेत त्या सुविधा सामान्य नागरिकांना मिळत नाहीत. अनेकदा स्टंटबाजीसाठी पत्रके काढून मोर्चा काढणार म्हणून महापालिकेला निवेदने दिली जातात. पण काही दिवसांतच मोर्चा रद्द केला जातो. साध्या एका आश्वासनावर लोकप्रतिनिधी आपल्या मागणीवरील पकड ढिली करतात. त्यामुळे नागरी समस्या, जनतेचे प्रश्न जैसे थे राहतात. सिडकोत कोणत्याही मागणीला शेवटपर्यंत पुढे नेले नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. सिडको तसेच हडको भागांत सार्वजनिक शौचालये, उद्यानाचे नूतनीकरण व गेल्या अनेक दिवसांपासून काही लोकप्रतिनिधीच्या प्रभागात रखडलेला घरकुलाचा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही. सिडकोत काही नगरसेवक स्वत: कंत्राट घेण्याच्या मागे असतात. पण कंत्राटदाराकडून चांगली कामे करून घेण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे एखाद्या प्रभागात त्या प्रभागातील नगरसेवक विकासाकडे पाहात असताना दुसरा त्याच पक्षाचा त्यास विरोध करत असल्याचे चित्र सिडकोत पहावयास मिळत आहे. काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सिडकोच्या विकासासाठी पुढाकार घेणे आवश्यक असताना केवळ पत्रकबाजी शिवाय काही होत नाही. हडकोत शिवाजी उद्यान नूतनीकरण, घरकुल योजना, सार्वजनिक शौचालय, हडकोत बसथांब्यावर प्रवासी निवारा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका इंदूताई घोगरे यांनी मंगळवारी (ता.24) मोर्चाचे आयोजन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...