गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस.

https://www.facebook.com/marathiswarajya1985
आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आज (बुधवार) ४६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. माधुरीने बॉलिवूडमध्ये असे काही आपले स्थान निर्माण केले आहे, की अनेक अभिनेत्री तिला आदर्श मानतात.


माधुरीचा जन्म 1967 मध्ये झाला. तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जीवनसाथी डॉक्टरच निवडला. माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर काही मोजक्याच चित्रपटात काम केले. माधुरीचे तेजाब, राम लखन, परिंदा, साजन, खलनायक, दिल, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, लज्जा, पुकार, देवदास असे चित्रपट प्रसिद्ध आहेत.

आपल्या स्मितहास्याने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या माधुरीला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...