रविवार, २९ डिसेंबर, २०१३
स्मार्टफोनवरून करता येणार चेक क्लिअर
अनेकदा चेक क्लिअर करण्यासाठी म्हणून ऑफिसवरून लवकर पळावे लागते किंवा ऑफिसला थोडे उशिरा पोहोचतो. पण लवकरच हा त्रास संपणार आहे. कारण
स्मार्टफोनवरून चेक क्लिअर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोनद्वारे चेक क्लिअर करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिटनमधील बँका विशेष प्रयत्नशील आहेत. लवकरच तेथे ही सुविधा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर ग्राहकाला चेकचा एक फोटो काढून बँकेकडे नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावरून हा फोटो पाठवावा लागेल. या फोटोवरून मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यानंतर चेक क्लिअर करण्यात येईल.
बीबीसीच्या वृत्तानुसार ब्रिटन सरकार या प्रस्तावावर विचार करत आहे. ही सुविधा लागू केली तर ग्राहकांचा त्रास कमी होईल. तसेच बँकेच्या व्यवस्थेवर येणारा ताणही कमी होईल. चेक क्लिअरींसोबतच चेकने होणाऱ्या अन्य व्यवहारांवर लक्ष्य ठेवणे सरकारला सोपे जाईल. बँकांच्यामते नवीन सुविधा लागू केल्यास आर्थिक व्यवहार अधिक सोपे होतील. दरम्यान, भारतात ही सुविधा उपलब्ध होणार की नाही हे अद्याप स्पस्ट झालेले नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...