शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

बर्गर, फ्राइज हानीकारक - मॅकडोनाल्ड कंपनी.

भारतीय तरुण-तरुणींना बर्गर, फ्रेंच फ्राइजसारख्या फास्ट फूडची चटक लावणाऱ्या मॅकडोनाल्ड कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना मात्र फास्ट फूडपासून चार हात लांबच राहण्याचा सल्ला दिला आहे.
'ग्राहकांना आपले पदार्थ सर्व्ह करा, पण तुम्ही या पदार्थांच्या आहारी


जाऊ नका,' अशी ताकीदच मॅकडोनाल्डने कर्मचाऱ्यांना दिली आहे.

सीएनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, मॅकडोनाल्डच्या साइटवरील एका पोस्टमध्ये कंपनीने कर्मचाऱ्यांना हा सल्ला दिला आहे. 'फास्ट फूड हे लवकर तयार होते, परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असते, स्वयंपाकाला पर्याय म्हणून तुम्ही फास्ट फूडकडे पाहू शकता. असे अनेक फायदे असले तरी फास्ट फूडमध्ये कॅलरीज, फॅट्स, सॅच्युरेटेड फॅट्स, साखर आणि मिठाचे प्रमाणे जास्त असते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभावतो,' असे कंपनीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

बर्गर, फ्राइज आणि सोडा हानीकारक

मॅकडोनाल्डच्या साइटवरील 'हेल्थ एनसायक्लोपीडिया' सेक्शनमध्ये थर्ड पार्टी व्हेंडरमार्फत ही पोस्ट अपडेट करण्यात आली आहे. यापैकी एका पोस्टमध्ये बर्गर, फ्राइझ आणि सोड्यासारख्या मॅक्डोनाल्डच्या सर्वाधिक खपाच्या पदार्थांनाही आरोग्यासाठी हानीकारक पदार्थांच्या यादीत टाकले आहे. ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृद्याशी संबंधित आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेणे गरजे आहे, असे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मॅकडोनाल्डने या पोस्ट संदर्भात स्वत:हून स्पष्टीकरण दिले आहे. 'गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमच्या मेन्युमध्ये ऐग व्हाइट्स आणि फ्रूट् स्मुथीझसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश केला आहे. आम्ही पौष्टिक पदार्थांना विशेष महत्व देतो, असे मॅक्डोनाल्डने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...