शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

महाराष्ट्रात सर्वाधिक कार्यरत उद्योग


देशातील सर्वाधिक कार्यरत उद्योग महाराष्ट्र आणि दिल्ली असून या दोन राज्यांत प्रत्येकी १.८ लाखहून अधिक कार्यरत उद्योग आहेत. महाराष्ट्रातील संख्या १.८२३ लाख तर दिल्लीतील संख्या १.८१५ लाख ‌इतकी आहे. त्यानंतर क्रमांक आहे तो पश्चिम बंगालचा. या राज्यात १.२९७ लाख कंपन्या कार्यरत आहेत. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातच देशाच्या विविध भागांत ६६०० कंपन्या नोंदणीकृत झाल्या असून त्यांचे एकूण ऑथोराईझ्ड भांडवल २,८३३.८७ कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी सर्वाधिक १३०४ नव्या कंपन्यांची नोंदणी महाराष्ट्रातच झाली आहे!

देशात एकूण १३.५२ लाख नोंदणीकृत कंपन्या असल्या तरी त्यापैकी ९.१२ लाख कंपन्याच सध्या कार्यरत आहेत. उर्वरित १.४४ लाख उद्योग अनुउत्पादित स्थितीत ( dormant) आहेत. सलग तीन वर्षे ताळेबंद सादर न करणा‍ऱ्या किंवा वार्षिक रिटर्न्स न भरणा‍ऱ्या कंपन्यांना अनुउत्पादित स्थितीत मानल्या जातात. ऑक्टोबर अखेर बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या २.६५ लाख असून त्यापैकी २.४१ लाख उद्योग दिवाळखोरीत निघाल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...