https://www.facebook.com/marathiswarajya |
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गाजियाबाद येथे भरवलेल्या जनता दरबारमध्ये एका तरुणाने आपल्या मनगटाची नस कापून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आपण आम आदमी पार्टीला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपली नस कापल्याचे या तरुणाचे म्हणणे होते.
झमील अहमद असे या तरुणाचे नाव असून तो देओळी येथून आपली तक्रार घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारमध्ये आला होता. दरबारामध्ये एक एकाच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात असतानाच अहमदने स्वत:च्या मनगटावर ब्लेड फिरवले. सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा, असे म्हटले आहे. त्याप्रमाणेच मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे, असं त्यानं केजरीवालांकडे पाहत सांगितलं. तरुणाच्या मनगटातून रक्त वाहत असल्याचे पाहून केजरीवाल यांनी आपल्या समर्थकांना झमीलला हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले.
झमीलची प्रकृती स्थिर असून त्याच्या जिवाला कोणताही धोका नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. झमील हा दिल्लीतील झोपड्यांची समस्या मांडण्यासाठी केजरीवाल यांच्या जनता दरबारात आला होता. केजरीवाल यांनी झोपड्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी झमीलची मागणी होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...