गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

ओम्नी कारला आग लागून दोघांचा मृत्यू

बीड- ओम्नी कारसह जळालेले दोन मृतदेह गुरुवारी (ता. 26) डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे आढळून आले. एकावर नगर येथे उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बीड - कल्याण राज्य मार्गावर अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) परिसरात एक जळालेली ओम्नी कार (एम. एच. 14 ए. एम. 239) गुरुवारी सकाळी आढळून आली. पाहणी केली असता आतमध्ये मागच्या सिटवर जळालेल्या अवस्थेतील दोन मृतदेह आढळून आले.

यानंतर अंमळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. हा प्रकार कशामुळे घडला हे अद्याप समजू शकले नाही. एकावर नगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...