शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

लेंडी प्रकल्पाच्या विकास कामांचा पालकमंत्री सावंत यांच्याकडून आढावा



नांदेड, दि. 26 :- लेंडी प्रकल्पाचा पहिल्या टप्पा पूर्ण करताना लोकांच्या पूनर्वसनाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न लवकर सोडविण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.
  
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित नांदेड पाटबंधारे मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हाधिकारी धीरजकुमार, नांदेड पाटंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता बी. एस. स्वामी, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एम. जी. संगनोर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी बोरगावकर यांची उपस्थिती होती.
http://weeklymarathiswarajya.blogspot.in/
लेंडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील तीन गावांपैकी हसनाळ येथील 39 कुटूंबासाठी 4 हेक्टर जमिनीचा निवाडा झाला असून संबंधीत शेतकरी मावेजा घेत नाहीत त्यासाठी पूनर्वसन समितीने सूचविलेल्या पर्यायी 3.50 हेक्टर क्षेत्र संपादित करण्याकरीता कलम 4 ची कार्यवाही झाल्यावर खासगी वाटाघाटीने सदर क्षेत्र घ्यावे व निवाडा झालेल्या 4 हेक्टर क्षेत्र तसेच ठेवून त्यावर नंतर निर्णय घेण्यात यावा. तसेच भेंडेगाव खुर्द येथील निवाडा उच्च न्यायालयाने रद्द केला असून पर्यायी जमीन पूनर्वसन समितीच्या पहाणीनुसार निश्चित केलेले क्षेत्र पट्टेधारकाचे असून ती जमीन जिल्हाधिकारी यांनी पाहून करुन त्वरीत निर्णय घ्यावा, अशी सूचना पालकमंत्री सावंत यांनी यावेळी केली. बिहारीपूर येथील 6.01 हेक्टर क्षेत्राच्या घोषित निवाडयानुसार मावेजा 2 कोटी 27 लाख एवढा निधी महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. महसूल विभागाने जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एका महिन्यात घेण्याबाबत सूचना यावेळी करण्यात आली. सदर गावाची जमिन ताब्यात आल्यास घळभरणीचा पहिल्या टप्प्यातील मार्ग मोकळा होईल, असे अधिक्षक अभियंता श्री. स्वामी यांनी सांगितले. यावेळी लेंडी प्रकल्पासाठी जमिन देणाऱ्या गावांच्या पूनर्वसनाच्या विविध प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...