मानवाधिकार आयोग
नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या जपणूकीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या www.nhrc.nic.in
या अधिकृत वेबसाइटवर आयोगाच्या कार्यव्याप्तीविषयी माहिती मिळते.
राष्ट्रीय मानवाधिकार कायदा, १९९३ आणि या कायद्याच्या अनुषंगाने सामान्य
नागरिकांना उपलब्ध झालेले अधिकार याविषयी वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली
आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकाराच्या दृष्टीने आतापर्यंत झालेले महत्त्वाचे
निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे, सुओ-मोटू खटले, कोर्टाचे निकाल इत्यादी
माहितीही येथे उपलब्ध आहे. मानवाधिकारासंबंधी ऑनलाइन तक्रारही या
वेबसाइटवरून दाखल करता येऊ शकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...