शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

मराठा आरक्षण आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची चढाओढ


ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र २५ टक्के आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी मराठवाडा आरक्षण कृती समितीच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये

पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र २५ टक्के आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी मराठवाडा आरक्षण कृती समितीच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबादमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिक्षण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उपस्थिती लावली. तसेच, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, उस्मानाबादचे उपनगराध्यक्ष अमित शिंदे, काँग्रेसचे धनंजय रणदिवे यांनीही आंदोलनस्थळाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...