सोमवार, ६ जानेवारी, २०१४
राहुलचा मुलगा पुढचा पक्षाध्यक्ष
'एखाद्या नेत्याच्या मुलाला निवडणुकीचं तिकीट देणं म्हणजे घराणेशाही होत नाही, तर एकाच घराण्याला पक्षाचे सर्वाधिकार देणं ही खरी घराणेशाही आहे. ती फक्त काँग्रेसमध्ये चालते,' असं सांगतानाच, 'भविष्यात राहुल गांधींना मुलगा झाला तर तोच काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष होईल,' अशी टोलेबाजी उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी अमीत शहा यांनी केली.
बड्या नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश भाजपमध्ये सध्या अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. नरेंद्र मोदींचे उजवे हात मानल्या जाणाऱ्या अमीत शहा यांनी या वादात बड्या नेत्यांची बाजू उचलून धरली आहे. काही नेत्यांच्या मुलांना तिकीटं मिळाली म्हणून लगेच भाजपवर घराणेशाहीचा आरोप करणं चुकीचं आहे,' असं शहा म्हणाले. 'काँग्रेसमध्ये जे चालतं ती घराणेशाही आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीला दिलं जात नाही, तसं भाजपमध्ये झालं तर घराणेशाही म्हणता येईल,' असं शहा म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश सिंह, निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमापति रामत्रिपाठी, खासदार लालजी टंडन, सत्यदेव सिंह यांच्यासह अन्य काही मोठ्या नेत्यांच्या मुलांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याचं घाटत आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांमध्ये नाराजी आहे. मात्र शहा यांच्या या पवित्र्यामुळे आता १९ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या पहिल्या उमेदवार यादीबाबत उत्सुकता आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...