सोमवार, ६ जानेवारी, २०१४
मराठा आरक्षण १० जानेवारी पर्यंत
आज सगळीकडे मराठा आरक्षणाची चर्चा जोरात चालू आहे. १० जानेवारी पर्यंत आरक्षण घोषित होण्याची शक्यता आहे. पण आज कोणी विचार केला आहे का? कि मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली आहे?. आज शैक्षणिक संस्था,साखर कारखाने,सहकारी संस्था या मराठा समाजाच्या काही नेत्यांच्या आहेत. पण त्यांनी कधी समाजाचा विचार केला का? त्यांनी फक्त स्वताची पोटे भरायची कामे केली.आणि स्वताचे नाव मोठे करायचे काम केले बाकी याच्या पलीकडे यांनी काहीच केले नाही. आजचा विचार करता शिक्षण घेणे फार मोठे जिकरीचे झालेले आहे. शिक्षणासाठी लागणारा गरीब वर्ग हा खर्च कुठून करणार? तेव्हा नाईलाजापोटी आरक्षणं मराठा समाजाला मागाव लागत आहे? पण याला सुद्धा नालायक नेत्यांचा विरोध आहे .कारण विनायक मेटे यांच्या म्हणण्यानुसार १९९० पासून ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत आहे. पण हेच विनायक मेटे निवडणूक आली का आरक्षण पाहिजे असे ओरडतात. पण निवडणूक झाली का? शांत बसतात.विशेष म्हणजे ते ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठा समाजाचे असून सुद्धा ते समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण असावे असे म्हणतात? याचा अर्थ आम्ही काय समजावा हे समाजाचा वापर निवडणुकी पुरता करतात.निवडणूक झाली का समाजाला बाजूला करायचे? आणि विनायक मेटे हे त्यांचा साहेबांना निक्षून का सांगत नाही साहेब समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे? पण मेटे पवारांच्यापुढे लाचार आहेत असे मला वाटते.कारण ते जर खरोखर जातिवंत मराठा असते तर त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा पवारांच्याकडे सोपवायला पाहिजे होता? म्हणजे आम्हाला मेटेंचा अभिमान वाटला असता?. पण आज मराठा समाजाची अवस्था अत्यंत वाईट असून या समाजाची ६०% जनता हि शेतकरी असून गरिबीत दिवस काढत आहे . त्यांच्या शेतमालाला भाव नाही. "भाव आहे पण माल नाही आणि माल आहे पण भाव नाही" अशी त्यांची अवस्था आहे. शेवटी त्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्या शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. कारण शेता साठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा नसतो. या गोष्टीचा विचार करता या समाजाला आरक्षण द्यावे? जेणेकरून मुठभर लोकांसाठी समस्त जनतेचा बळी या राजकीय नेत्यांनी द्यायचा विचार केलेला दिसतो. याला काय म्हणायचे स्वताच्या स्वार्थासाठी समस्त समाजाचा बळी द्यायचा हि भावना सोडून तरी समाजासाठी एकत्र येउन समजला न्याय द्यावा अशी अपेक्षा करायला हरकत नाही?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...