शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

'आप'चे एक कोटी सदस्यांचे लक्ष्य- केजरीवाल


आम आदमी पक्षाने (आप) ऑनलाइन सदस्य नोंदणी मोहीम आजपासून (शुक्रवार) सुरू केली असून, 26 जानेवारी पर्यंत 'आप'चे एक कोटी सदस्य करण्यावर आमचे लक्ष असणार आहे, असे पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

'आप'च्या ऑनलाइन नोंदणी मोहिमेचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, 'आप'चे सदस्य होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सदस्य मोहीम पूर्णपणे मोफत आहे. आजपासून ते 26 जानेवारीपर्यंत आमचे एक कोटी सदस्य करण्यावर मुख्य लक्ष असणार आहे. ही मोहीम सर्वांसाठी खुली आहे. 

'आप'चे सदस्य होण्यासाठी 07798220033 या क्रमांकावर मिस कॉल देऊन अथवा एसएमएसच्या माध्यमातून आपली माहिती पाठवून सदस्य होऊ शकता. अथवा aamaadmiparty.org या संकेतस्थळावर जाऊनही नाव नोंदणी करता येणार आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...