Nanded Maharashtra blog लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Nanded Maharashtra blog लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी खुशखबर ..

सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी खुशखबर ..

केंद्र सरकारच्या सी.जी.टी.एस.ई योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांना ५० लाख रुपये पर्येंत विना तारण कर्ज पुरवठा केला जाईल असं स्टेट बँक ऑफ पटियाला बँकेचे महाव्यवस्थापक श्री एस, विजयकुमार यांनी नांदेड इथ उद्योजकांच्या बैठकीत सांगितलं, ते नांदेड भेटीवर आले होते, यावेळी बोलताना ते म्हणाले की रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना नियम आणि अटी शिथिल करुण कर्ज पुरवठा केला जाईल, असे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात बँकेची सध्या एकच शाखा आहे

आदर्श प्रकरणी आरोप वापस घेण्याचे आदेश !

ashok chavan nanded
आदर्श प्रकरणी आरोप वापस घेण्याचे आदेश !
Ex Cm Ashok Chavan
आदर्श प्रकरणी अशोकराव चव्हाण यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी CBI ने राज्यपालाकडे परवानगी मागीतली पण राज्यपालांनी परवानगी तर दिली नाहीच आरोप वापस घेण्याचे आदेश दिल्याने CBI ला चांगलीच चपराक बसल्याचे बोलल्या जात आहे.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

गॅस वितरकाचे दुकान अचानक बंद राहिल्याने ग्राहकांची गैरसोय.




दि.१९ - नांदेड (प्रतिनिधी)-
आनंदनगर चौकातील इंण्डेन रेणुकादेवी गॅस वितरकाचे दुकान गुरुवारी अचानक बंद राहिल्याने ग्राहकांना बंद दुकानाचे दर्शन घेऊन परत जावे लागलेे.
आधार कार्डाची सक्ती व अन्य जाचक नियमामुळे सध्या सर्वच गॅस ग्राहक कमालीचे वैतागले आहेत.
आनंदनगर भागात इंण्डेन रेणुकादेवी गॅस वितरक दुकान आहे.
हे दुकान आनंदनगर कोपर्‍यावर मध्यवस्तीत असून आधार कार्ड व अन्य कामा निमित्ताने सर्वसामान्य ग्राहक सकाळी १० वाजता त्या दुकानावर पोहचले परंतु दुकानाचे शटर बंद होते. अपरिहार्य कारणास्तव आज दुकान बंद राहील अशी चिठ्ठी शटरवर चिटकवली होती.
ती चिठ्ठी वाचून आणि शटरला मोठे कुलूप पाहून शेकडो लोक आल्या वाटेने परत गेले.
तेथे कोणीही जबाबदार माणूस नव्हता. या बाबत कोणता प्रश्‍न विचारावा आणि कोणाला असा सवाल ग्राहकाला पडला होता. कांही जणांनी ९८६००८४११६४ या क्रमांकावर भ्रमणध्वनी लावला. मला माहित नाही, मी बाहेरगावी आहे असे उत्तर नरवाडे नावाच्या कर्मचार्‍याने दिले आणि स्वतःची
सुटका करून घेतली. परंतु अन्यत्र मिळालेल्या माहितीनुसार रेणुकादेवी गॅस वितरक कंपनीतील एका कर्मचार्‍याचे नातेवाईक यांचे अचानक निधन झाले त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारासाठी जावे लागले त्यामुळे स्वतःच्या अखत्यारित चिठ्ठी चिटकवून ते कर्मचारी शटरला कुलूप लावून निघून गेले.
परंतु असे कर्मचार्‍याला करता येते का? पर्यायी सोय का केली नाही या प्रश्‍नाचे उत्तर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी संबंधित एजंसीला विचारले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाला या बाबत फोनवरून चौकशी केली असता कोणीही फोन उचलला नाही.
या बाबत संबंधित एजंसीला जिल्हाधिकारी जाब विचारतील का असा प्रश्‍न उत्पन्न होत आहे ?