मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

पत्रकार मित्रांनो,

तुमच्यासाठी उपयुक्त अशी माहिती या ब्लॉगमध्ये संकलित केली आहे. शुद्धलेखनाचे नियम, पारिभाषिक प्रतिशब्द, भारतीय संकल्पनांचे विवरण, लेखनसंबंधीच्या सूचना, शैली पुस्तिका, योग्य - अयोग्य शब्दांची सूची, असे बरेच काही इंटरनेटवर प्रसंगपरत्वे गवसले, ते या ब्लॉगवर आपल्यासाठी, विशेषतः जे नवोदित पत्रकार आहेत त्यांच्यासाठी संकलित केलेले आहे. या सर्व मजकुराचे श्रेय त्यांच्या मूळ निर्मात्यांचेच आहे. मी तो हमाल भारवाही.. अशीच माझी या ब्लॉगच्या निर्मितीमागील धारणा आहे. मी केवळ या मजकुराचे उपयुक्ततेचा निकष लावून संकलन केले आहे. छोट्या - मोठ्या मराठी वर्तमानपत्रांत काम करणारे पत्रकार माझ्या नजरेसमोर आहेत. आपल्याला या माहितीचा उपयोग झाला, तर माझ्या श्रमांचे चीज झाले असे मी समजेन. या ब्लॉगमध्ये संकलित करण्याजोगा काही मजकूर आपल्यापाशी असेल तर तो माझ्या ईमेल पत्त्यावर अवश्य पाठवावा.

पत्रकारितेतील उज्ज्वल कारकिर्दीसाठी आपल्याला शुभेच्छा...