मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

नववर्षाच्या प्रारंभाला भावसार चौकात श्रीमद्भभागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन


नांदेड - तरोडा खुर्द भागात नववर्षाच्या प्रारंभाला श्रीमदभागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आल आहे. येत्या 1 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हा सोहळा भावसार चौकातील शास्त्रीनगरात आयोजीत केला आहे

सोशल मीडियातल्या ‘लाख’मोलाच्या नोकऱ्या

गेल्या काही वर्षापासून सोशल नेटवर्किंग म्हणजे फक्त टाइमपास राहिलेला नाही. याच वर्षात फेसबुकने अनेक भारतीय तरुणांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या दिल्या. येणाऱ्या वर्षातही या क्षेत्रात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. २०१४ मध्ये सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रामध्ये नवीन सहा प्रोफाईल्ससाठी खूप मागणी निर्माण होणार आहे. सोशल नेटवर्किंगचा वाढता पसारा पाहता गलेलठ्ठ पगाराच्या या नोकऱ्या पटकाविण्याची संधी तरुण-तरुणींना असेल.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेनश (एसईओ) स्पेशॅलिस्ट

सर्च इंजिन्समध्ये सर्च केल्यावर आपली साइट प्राधान्याने दिसावी यासाठी तज्ज्ञ काम करत असतात. वेबसाइट अॅनलाइझ करणे, मार्केटिंगची तंत्रे तसेच साइटवर नवीन माहिती अपडेट करण्याचे काम असते. बॅचलर्स डिग्री, तीन वर्षाचा वेबसाईटशी संलग्न अनुभव असणाऱ्यांना चांगली संधी आहे. एचटीएमएल, सीएए आणि ब्लॉगिंग तुमच्यासाठी प्लस पॉईंट ठरु शकते.

वार्षिक पगार - ४० लाख (अंदाजे)

सोशल मीडिया स्ट्रॅटजिस्ट

कंपनीसाठी पब्लिक प्रोफाईल तयार करणे तसेच सोशल नेटवर्किंग साइटच्या मदतीने कंपनी आणि ग्राहकांमध्ये मध्यस्थीचे काम करणे हे यांचे मुख्य काम. जितके जास्त फॉलोअर्स तितके प्रोडक्ट आणि कंपनी प्रसिद्ध अशा साध्या गणितावर हे काम चालते. बॅचलर्स डिग्री, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना या प्रोफाइलमध्ये काम मिळू शकते.

वार्षिक पगार - ३७ लाख (अंदाजे)

ऑनलाइन कम्युनिटी मॅनेजर

कंपनी आणि ऑनलाइन कम्युनिटी (सोशल नेटवर्किंग, मेसेज बोर्डस, इमेल ग्रूप)मधील संवाद साधणारा दुवा म्हणजे ऑनलाइन कम्युनिटी मॅनेजर. जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर एकाच आवड असणारे अनेक लोक एकत्र येतात तेव्हा कंपन्यांना आपल्या उत्पादनांबद्दल जाहिरात करण्याची सर्वात चांगली संधी असते आणि ही संधी साधण्याचे काम मॅनेजरला करावे लागते. त्यासाठी क्रिएटीव्ह, व्यवसायिक दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. बॅचलर्स डिग्री, दोन वर्षांचा बिझनेस सेटिंगमधील अनुभव असणा-यांना चांगली संधी आहे. फोटोशॉप, व्हिडीओ एडिटींग आणि वेबसाईट डेव्हलपमेंटचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

वार्षिक पगार - ३५ ते ५० लाख रुपये (अंदाजे)

सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर

सोशल मीडिया मार्केटिंग सांभाळणे तसेच साइटच्या डिझायनिंगवर खास लक्ष देण्याचे काम पाहण्याची मुख्य जबाबदारी या प्रोफाईलवरील व्यक्तीला पार पाडावी लागते. जास्तीत जास्त लोकांना आपल्या साईटवर आणण्याचे मुख्य उद्दिष्ट्य या लोकांसमोर असते. बॅचलर्स डिग्री (एमबीए असल्यास उत्तम), कमीत कमी पाच वर्षांचा डिजीटल मार्केटिंगमधील अनुभव, चांगले लेखन आणि संवाद कौशल्य तसेच सोशल मीडियाचे उत्तम ज्ञान असणाऱ्यांना चांगली संधी आहे.

वार्षिक पगार - २० ते ३४ लाख रुपये (अंदाजे)

सोशल मीडिया मार्केटिंग कोऑर्डिनेटर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगला प्रतिसाद मिळेल अशी खास माहिती पुरवण्याचे काम कॉर्डिनेटर करतात. यामध्ये खास लेख, माहिती, फोटो, व्हिडीओचा प्रमुख्याने समावेश असतो. यामध्ये सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, लिंकड्इन, गुगल प्लस,पिनट्रेस इत्यादी) साईट्सवर पोस्ट अपडेट करण्यासाठी तासनतास ऑनलाइन रहावे लागते. यासाठी चांगले लेखन आणि संवाद कौशल्य हवे. ब्लॉगिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हिडीओ एडिटींगचे ज्ञान असल्यास तो तुमच्यासाठी तो प्लस पॉइंट ठरेल.

वार्षिक पगार - २० ते २८ लाख (अंदाजे)

ब्लॉगर किंवा सोशल मीडिया कॉपी रायटर्स

आपली ऑनलाइन अस्तित्व दाखवण्यासाठी अनेक कंपन्यांना ब्लॉगर आणि कॉपी रायटर्सची गरज आहे. लोकांना आपल्या साईटकडे वळवण्यासाठी ब्लॉगर्सची कंपन्यांना गरज असते. ब्लॉग पोस्ट, सोशल मीडिया नेटवर्क, मेसेज बोर्डसमार्फत लोकांना आपल्या साईटवर खिळवून ठेवण्याबरोबरच नवीन वाचक आणि फॉलोअर्स जोडण्याचे मुख्य काम ब्लॉगर्सना करावे लागते. यासाठी चांगली लेखनशैली, वाचन आणि ताज्या घटनांबद्दल अपडेट असणे गरजेचे आहे.

वार्षिक पगार - २५ ते २६ लाख (अंदाजे)

रविवार, २९ डिसेंबर, २०१३

रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी


जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती देऊन ही कामे त्वरित पूर्ण करावीत, असे आदेश पालकमंत्री  यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.

फारुख शेख काळाच्या पडद्याआड


स्मार्टफोनवरून करता येणार चेक क्लिअर


अनेकदा चेक क्लिअर करण्यासाठी म्हणून ऑफिसवरून लवकर पळावे लागते किंवा ऑफिसला थोडे उशिरा पोहोचतो. पण लवकरच हा त्रास संपणार आहे. कारण

नांदेडचे विद्यार्थी सुखरूप



देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत असून यासाठी इच्छूक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जी.एस.पडवळ यांनी केले आहे.

विविध देशानी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, त्याचा केलेला अवलंब, त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय तसेच संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यासाठी शासन निर्णयानुसार अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याची योजना मंजुर करण्यात आली आहे. युरोप, द. अफ्रिका, द. अशिया, द. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड, सिंगापूर इत्यादी देशांमध्ये अभ्यास दौऱ्याचे नियोजन आहे.
यासाठी 1 लाख 30 हजार ते 2 लाख 5 हजार खर्च अपेक्षित असून राज्यशासनाकडून खर्चाचे 50 टक्के किंवा रु. 1 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
दौऱ्यासाठी शेतकरी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्याचे स्वत:चे नावे वैध पारपत्र जे दौरे निघण्यापूर्वी 6 महिने मुदत असलेला असावा. शेतकऱ्यांचे स्व:ताचे नावे शेत जमिन नोंद असलेला सातबारा, आठ अ असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन प्रामुख्याने शेती असावे. शेतकऱ्याचे वय 21 ते 62 वर्षाच्या दरम्यान असावे. शेतकरी शासकीय, निमशासकीय संस्थेत नौकरीस नसावा. शेतकरी यापूर्वी केंद्र, राज्य शासनाच्या विभागामार्फत अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. परदेश दौऱ्यास जाण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संसर्ग जन्य रोगाची लागण झालेले नसावे. शासकीय आरोग्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.जी.एस.पडवळ यांनी केले आहे.

‘आदर्श’ : राज्यात सत्ता सोडा

' आदर्श' चा चौकशी अहवाल फेटाळून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराला पाठीशी घातले आहे.

'ब्राह्मण विद्यार्थ्यांना आरक्षण हवे'

राज्यातील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणाची सवलत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पेशवा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेनेतील लोकशाही आता बंद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील 'हॉटेल रामा इंटरनॅशनल'मध्ये औरंगाबाद व परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

नांदेड- बँगलोर एक्स्प्रेसमधील नांदेडचे ७ प्रवासी बेपत्ता.


मराठी महिलेचा अमेरिकी वाइन उद्योगावर झेंडा!



अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेकडून तीन गुन्हे दाखल

नांदेड - महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधी विभागातर्फे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर दिवसभरात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समाज कल्याणच्या सायकलचे चाक पंक्‍चर


बंगळुर-नांदेड एक्स्प्रेसला आग; 23 जणांचा मृत्यू

बंगळुर - आंध्र प्रदेशतील अनंतपूरम जिल्ह्यात

नांदेडातही "आम आदमी' जोरात



नांदेड -

जिल्ह्यात 700 वाहनांद्वारे निरंकुश अवैध वाहतूक

नांदेड - परिवहन विभागाच्या सोयीस्कर चुप्पीने जिल्ह्यात अवैध वाहतूक कमालीची बोकाळली आहे. सुमारे 678 खासगी वाहने सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. यामुळे सुमारे

जिजाऊ जन्मोत्सव साजरा..

सोमवारी लोकशाही दिन

नांदेड, दि. 27:- राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिण्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येत असतो. त्यानुसार सोमवार 6 जानेवारी 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. 

माहूर येथे 7 जानेवारीस होमगार्ड भरती.



'आदर्श'बाबत फेरविचार व्हावा!


विधानसभा निवडणुंकामध्ये बसलेल्या पराभवाच्या धक्क्याने काँग्रेसची झोप उडाली असून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भ्रष्टाचार आणि माहागाईमुक्तीचा यल्गार पुकारला. आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल फेटाळणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारला फैलावर घेतानाच त्यांनी याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे निक्षून सांगितले.

पुण्यात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

पुण्यात १९२१ मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ ब्रिटिश साम्राज्याचा वारसदार प्रिन्स ऑफ वेल्स याच्या हस्ते करून शिवाजी महाराजांचा गौरव देशोदेशी पोहोचवला होता. त्याच पुण्यात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

डिझेल लवकरच नियंत्रण मुक्त


सरकारने अनुदान कमी करण्यासाठी अधिक उपाय केले पाहिजे; तसेच कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे हे ठरविले पाहिजे, असे सांगताना पुढील काही महिन्यांत डिझेल नियंत्रणमुक्त होऊ शकते, असा संकेत

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

'आप'साठी तरुणाने नस कापली


https://www.facebook.com/marathiswarajya

मार्केटिंगसाठी इंटरनेट यूजरवर लक्ष



आदर्शबाबत प्रतिक्रियेस नकार



आदर्श घोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने फेटाळला असला तरी त्याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका राहुल गांधी यांचे निकटवर्ती खासदार व केंद्रीय माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मंगळवारी मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांनी बुधवारी नकार दिला. आदर्श संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. त्यावर आपण काही बोलणार नाही, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज यांचे काय?

लोकसभा निवडणुकीपूर्वी पृथ्वीराज यांना दिल्लीत आणण्याचा विचार चालू असल्याचे संकेत राहुल गांधी यांच्या गोटातून मिळत आहेत. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळणार नाही, अशी भावना दिल्लीतील काँग्रेसचे अनेक बडे नेते खासगीत व्यक्त करतात. त्याचवेळी, लोकसभा निवडणूक पाच महिन्यांवर आली असताना चव्हाण यांना दिल्लीत आणण्याची खेळी फारशी परिणामकारक ठरणार नाही, असाही एक मतप्रवाह पक्षात आहे. माणिकराव यांच्या जागी नव्या चेहऱ्याची नियुक्ती अपेक्षित असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांच्या जागी राज्यातील मंत्र्यांना उतरविण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात येत असल्याचे समजते.

सध्याची चर्चा कशावर?

काँग्रेसच्या काही निष्क्रिय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र देऊन त्याजागी नवे चेहरे आणणे.

गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेली मंत्रिमंडळातील तीन पदे भरणे.

महामंडळांवरील ​रखडलेल्या नियुक्त्या

काँग्रेस 'भाकरी' फिरवणार?


डॉ. नरेंद्र जाधव यांना पुरस्कार

  डॉ. नरेंद्र जाधव यांना पुरस्कार

प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालय सुरु - मोघे

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी कार्यालय सुरु करण्यात येणार असून येत्या महिनाभरात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी नांदेड इथ पत्रकार परिषदेत दिली.पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

विद्यापीठांमध्ये 'मराठा' गणना - शिक्षण संचालनालय.



पर्यटन विकासाचा आराखडा तयार करावा-पालकमंत्री


नायगाव पं.स. कार्यालयात केवळ १५ कर्मचारी उपस्थित

नांदेड : नायगाव पंचायत समिती कार्यालयात गुरूवारी ५२ कर्मचार्‍यांपैकी केवळ १५ कर्मचारी उपस्थित आढळून आल्याची बाब जि. प. सदस्य संजय बेळगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांच्या निदर्शनात आणून दिली आहे.
पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

माळेगाव पर्यटन क्षेत्र समावेश ?


नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ही पर्यटनाच्यादृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाची असून त्यासाठी प्रशासनाने पर्यटन विकासाचा पाच कोटी रूपयांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.

बीडमधून सुनील केंद्रेकरांना लोकसभेसाठी ‘आप’ची गळ


चांगली माणसे राजकारणात आली पाहिजेत. सर्वसामान्य माणूस राजकारणात आल्याशिवाय राजकारणातील कुप्रवृत्ती संपणार नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्ष बीडचे गाजलेले जिल्हाधिकारी

सोळा हॉस्पिटलमध्ये 'जीवनदायी'




केंद्र सरकारने गेल्या महिन्यात राजीव गांधी जीवनदायी योजना देशभर कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत औरंगाबाद शहरातील १६ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी राज्याच्या जीवनदायी योजनेतून पाच दुर्धर आजारांवर उपचारासाठी दारिद्र्यरेषेखालील रुग्णास दीड लाखांपर्यंतची आर्थिक मदत केली जात होती. आता केंद्राची योजना सुरू झाल्याने ही योजना बंद झाली.

नवीन योजनेंतर्गत ९७२ विकारांवर जीवनदायीत उपचार केले जाणार आहेत. ही यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. शहरातील १६ रुग्णालयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, द‌हिफळे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटल, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, अॅपेक्स मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल , सुमनांजली ‌नर्सिंग होम, उत्कर्ष हॉस्पिटल,जोशी हॉस्पिटल, रुबी हार्ट केअर, कृष्णा हॉस्पिटल, एमआयटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, सिग्मा मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल, जिल्ला हॉस्पिटल आणि हयात हॉस्पिटल यांचा समावेश आहे.

अलका लांबा ‘आप’मध्ये


'एनएसयूआय'च्या माजी अध्यक्ष आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अलका लांबा यांनी काँग्रेसला अलविदा केला असून त्यांनी 'आम आदमी पक्षा'ला आपलेसे केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची चढाओढ


ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र २५ टक्के आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी मराठवाडा आरक्षण कृती समितीच्या वतीने उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये

पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

मानवाधिकार आयोग

मानवाधिकार आयोग

नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या जपणूकीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या www.nhrc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आयोगाच्या कार्यव्याप्तीविषयी माहिती मिळते. राष्ट्रीय मानवाधिकार कायदा, १९९३ आणि या कायद्याच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना उपलब्ध झालेले अधिकार याविषयी वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकाराच्या दृष्टीने आतापर्यंत झालेले महत्त्वाचे निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे, सुओ-मोटू खटले, कोर्टाचे निकाल इत्यादी माहितीही येथे उपलब्ध आहे. मानवाधिकारासंबंधी ऑनलाइन तक्रारही या वेबसाइटवरून दाखल करता येऊ शकते.

लेंडी प्रकल्पाच्या विकास कामांचा पालकमंत्री सावंत यांच्याकडून आढावा



नांदेड, दि. 26 :- लेंडी प्रकल्पाचा पहिल्या टप्पा पूर्ण करताना लोकांच्या पूनर्वसनाच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न लवकर सोडविण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.

जीवनदायी’ योजनेचा संभ्रम कायम



केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अंमलबजावणीचा संभ्रम अजूनही घाटी हॉस्पिटलमध्ये कायम आहे. ९७२ विकारांवर उपचार करण्यासाठी कोणते निकष आहेत?

केजरीवालांचा शपथविधी ...

विधानसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस 'सफाई' केल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी निश्चित केलेली तारीख २८ डिसेंबर

बर्गर, फ्राइज हानीकारक - मॅकडोनाल्ड कंपनी.

भारतीय तरुण-तरुणींना बर्गर, फ्रेंच फ्राइजसारख्या फास्ट फूडची चटक लावणाऱ्या मॅकडोनाल्ड कंपनीने स्वत:च्या कर्मचाऱ्यांना मात्र फास्ट फूडपासून चार हात लांबच राहण्याचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कार्यरत उद्योग


देशातील सर्वाधिक कार्यरत उद्योग महाराष्ट्र आणि दिल्ली असून या दोन राज्यांत प्रत्येकी १.८ लाखहून अधिक कार्यरत उद्योग आहेत. महाराष्ट्रातील संख्या १.८२३ लाख तर दिल्लीतील संख्या १.८१५ लाख ‌इतकी आहे. त्यानंतर क्रमांक आहे तो पश्चिम बंगालचा. या राज्यात १.२९७ लाख कंपन्या कार्यरत आहेत. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातच देशाच्या विविध भागांत ६६०० कंपन्या नोंदणीकृत झाल्या असून त्यांचे एकूण ऑथोराईझ्ड भांडवल २,८३३.८७ कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी सर्वाधिक १३०४ नव्या कंपन्यांची नोंदणी महाराष्ट्रातच झाली आहे!

देशात एकूण १३.५२ लाख नोंदणीकृत कंपन्या असल्या तरी त्यापैकी ९.१२ लाख कंपन्याच सध्या कार्यरत आहेत. उर्वरित १.४४ लाख उद्योग अनुउत्पादित स्थितीत ( dormant) आहेत. सलग तीन वर्षे ताळेबंद सादर न करणा‍ऱ्या किंवा वार्षिक रिटर्न्स न भरणा‍ऱ्या कंपन्यांना अनुउत्पादित स्थितीत मानल्या जातात. ऑक्टोबर अखेर बंद पडलेल्या कंपन्यांची संख्या २.६५ लाख असून त्यापैकी २.४१ लाख उद्योग दिवाळखोरीत निघाल्या आहेत.

आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली

नांदेड : सामाजिक वनीकरण कार्यालय नांदेड, अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील रोपवाटिका तसेच मजुरांची संख्या यासंदर्भात मागितलेली माहिती देण्यास संबंधित विभाग दीड वषार्ंपासून टाळाटाळ करीत असून
पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

नांदेडमध्ये वर्षभरात ४० शेतक-यांच्या आत्महत्या


नांदेड जिल्ह्यामध्ये या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, खरीप हंगामामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अतिवृष्टी झालेल्या भागासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही मदतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे

बाजारपेठेवर तरुणाईचे राज्य


भारतीय चलनाची झालेली घसरण आदीचा परिणाम सरत्या वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने व्यापार क्षेत्रावर होता; परंतु त्यांची कसर नंतर

उसाला अठराशेचा पहिला हप्ता


पश्चिम महाराष्ट्रात उसाला जादा भाव मिळावा यासाठी आंदोलने झाली. त्याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होतो आहे. मराठवाड्यात मात्र सर्व साखर कारखानदार एकत्र आले आहेत. मराठवाड्यातील बहुतेक सर्व साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात पहिला हप्ता

दंगलप्रकरणी मोदींना क्लीन चिट


गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी अहमदाबाद कोर्टाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज क्लीन चिट दिली. कोर्टाच्या निर्णयाने मोदींना मोठा दिलासा मिळाला असून भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

'जातिअंतासाठी बौद्ध संस्कृती प्रस्थापित व्हावी '

नांदेड - ब्राह्मणी आणि भांडवली व्यवस्थेला संपविण्यासाठी व जातिअंतासाठी बौद्ध संस्कृती प्रस्थापित करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विद्रोही कवी राहुल वानखेडे यांनी बुधवारी (ता. 25) व्यक्त केली.

पोर्टफोलिओ बनवा दर्जेदार कंपन्यांचा!

"मॉर्गन स्टॅन्ले' ही जगातील प्रमुख "इन्व्हेस्टमेंट बॅंक्‍स'पैकी एक बॅंक आहे. त्यांनी भारतातील 200 मोठ्या कंपन्यांचा गुंतवणुकीच्यादृष्टीने सखोल अभ्यास केला. त्या कंपन्यांची 14 निकषांवर परीक्षा केली. उदा. विक्रीमधील वाढ, नफ्याचे प्रमाण, पीई रेशो, डिव्हिडंड यिल्ड, डेट-इक्विटीचे प्रमाण, "ईपीएस'मधील वाढीचा दर, भांडवलावरील परतावा, "एफआयआय'चा कंपनीतील हिस्सा, शेअरमधील उलाढाल या सर्व निकषांवर चांगली कामगिरी करणाऱ्या "टॉप ट्‌वेंटी' कंपन्या स्थानानुसार अशा -

1) पेज इंडस्ट्रीज, 2) बॉश, 3) इन्फोसिस, 4) श्रीराम सिटी युनियन, 5) क्रिसिल, 6) बजाज ऑटो, 7) आयटीसी, 8) टीसीएस, 9) एनएमडीसी, 10) ऑइल इंडिया, 11) सन फार्मा, 12) करूर वैश्‍य बॅंक, 13) एचडीएफसी बॅंक, 14) एशियन पेंट्‌स, 15) श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स, 16) इमामी, 17) एम अँड एम फायनान्शियल, 18) नेस्ले, 19) कॅडिला, 20) विप्रो.

छोट्या गुंतवणूकदारांना कंपन्यांचा सखोल अभ्यास स्वतः करणे शक्‍य नसल्याने ते वरील कंपन्यांपैकी आपल्या आवडीच्या 5 ते 10 कंपन्यांचा पोर्टफोलिओ खालीलप्रमाणे बनवू शकतात.
1) वरील यादी, कंपन्यांच्या "रॅंक'प्रमाणे बनविलेली असल्याने शक्‍यतो वरचा क्रमांक असलेल्या कंपन्यांना प्राधान्य द्यावे.
2) आपली गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्‍टरमध्ये विभागून ठेवावी.
3) सर्व खरेदी आत्ताच न करता, बाजारामध्ये "करेक्‍शन' येण्याची वाट पाहावी.
4) शेअरचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीजवळ आल्यास थोडीफार खरेदी करावी.
5) भाव काही कारणाने गेल्या वर्षभरातील नीचांकी पातळीजवळ आल्यास अजून खरेदी करावी.
6) वरीलप्रमाणे "मार्केट टायमिंग' जमणार नसल्यास, आपल्या आवडत्या शेअरमध्ये "स्टॉक एसआयपी' सुरू करावी.
"मॉर्गन स्टॅन्ले'च्या मते, वरील 20 शेअर पुढील 10 वर्षांत सातत्याने चांगला परतावा देऊ शकतील, तेव्हा, चला बनवूया "दर्जेदार पोर्टफोलिओ!'

मराठा आरक्षण टप्प्यात





राज्यातील राजकारणावर पकड असलेल्या ; पण शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेल्या मराठा समाजासाठीचे आरक्षण आता टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून .....

पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस.

https://www.facebook.com/marathiswarajya1985
आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आज (बुधवार) ४६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. माधुरीने बॉलिवूडमध्ये असे काही आपले स्थान निर्माण केले आहे, की अनेक अभिनेत्री तिला आदर्श मानतात.

मूलभूत सुविधांसाठी क्षेत्रीय कार्यालयावर "हल्लाबोल'

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयावर मंगळवारी (ता. 24) मोर्चा काढण्यात आला. संतप्त युवकांनी साठे चौकातही काही वेळ रास्ता रोको केला.

सुविधांसाठी लोकप्रतिनिधींच्याच हाती मोर्चाचे हत्यार

नवीन नांदेड - महापालिकेच्या सिडकोतील विविध प्रभागांत नागरी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे मित्रपक्षही विकासकामात एकत्र दिसून येत नसल्याने सत्तेत असूनही सिडकोतील विकासकामासाठी लोकप्रतिनिधींनाच मोर्चाचे हत्यार उपसावे लागत आहे.

महापालिकेची हद्दवाढ करून गावठाण क्षेत्रात समावेश करा

नांदेड - महापालिकेची हद्दवाढ करून गावठाण क्षेत्रात समावेश करा, अशी आग्रही मागणी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

महापालिकेने यावर्षीच्या मालमत्ता कराच्या नोटिसीमध्ये करआकारणी करताना नव्यानेच अकृषिक कराचाही समावेश केला आहे. त्याचबरोबर पालिकेनेदेखील यंदाच्या वर्षी राज्य शासनाच्या आदेशानुसार करआकारणी लागू केल्यामुळे त्यात वाढही झाली आहे. त्यामुळे मालमत्ता करवाढ आणि अकृषिक कराचा समावेश यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असून त्याची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. सध्या महापालिकेमध्ये नागरिक गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करत असल्यामुळे पूर्वीप्रमाणेच महसूल विभागास अकृषिक कराच्या वसुलीचे काम देण्यात यावे. तसेच पूर्वीच्या मालमत्ता कराच्या आकारणीमध्ये व सध्याच्या करआकारणीमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्याचाही विचार करून नागरिकांना मालमत्ता कराच्या सुधारित नोटिसा द्याव्यात, अशी मागणीही आमदार पोकर्णा यांनी निवेदनात केली आहे.

श्रीक्षेत्र माळेगावच्या पर्यटन विकासाचा आराखडा पाच कोटीचा ?




नांदेड, दि. 26 :- दक्षिण भारतात सुप्रसिध्द असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ही पर्यटनाच्यादृष्टिने सुध्दा अत्यंत महत्वाची असून त्यासाठी प्रशासनाने पर्यटन विकासाचा पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना  राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, विशेष सहाय्य व अपारंपारिक ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केली.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेस 31 डिसेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री सावंत यांनी श्रीक्षेत्र माळेगाव येथे बुधवारी आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आमदार शंकरअण्णा धोंडगे, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, उपाध्यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती संजय कऱ्हाळे, समाज कल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर, महिला बालकल्याण सभापती कौशल्याबाई कनशेट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, अप्पर पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पर्यटन विकासाचा आराखडा मंजूरीसाठी राज्याच्या व केंद्राच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे सांगून पालकमंत्री सावंत पुढे म्हणाले की, श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेचे महत्व अबाधित रहावे किंबहुना ते सतत वाढावे यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरुंच्या सुविधेसाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. पोलीस विभागाने विशेषत: ही यात्रा शांतता व सुव्यवस्था कायम राखून पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा. आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन घेण्यात यावेत. यात्रेकरुंच्या मदतीसाठी पोलीस विभागाने सदैव सतर्क राहावे, असेही ते म्हणाले.
यात्रा आयोजनासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करुन पालकमंत्री सावंत म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माळेगाव येथे 35 लाख रुपये खर्चून सभागृह बांधण्यात आले असून याचा लाभ यात्रेकरुंना होणार आहे. माळेगावातील पाणी पुरवठयाच्या व विकासाच्या योजनांसाठी यात्रेनंतर विशेष लक्ष दिले जाईल. मद्यविक्री बंदीचा निर्णय यात्रेमध्ये कडकपणे राबविला जाईल यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज प्रतिपादन करुन सावंत यांनी ग्रामस्थ व यात्रेकरुंच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने ही यात्रा दरवर्षी प्रमाणे चांगली होईल यासाठी लक्ष केंद्रीत करावे असेही सांगितले.

ओम्नी कारला आग लागून दोघांचा मृत्यू

बीड- ओम्नी कारसह जळालेले दोन मृतदेह गुरुवारी (ता. 26) डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे आढळून आले. एकावर नगर येथे उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गैरव्यवहार.

खासदार भास्करराव खतगावकर यांच्या गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्यासह जिल्हय़ातील तीन साखर कारखान्यांना खिरापतीप्रमाणे वाटण्यात आलेली कोटय़वधी रुपयांची कर्जे, तसेच बेकायदेशीर नोकरभरतीसह अन्य १५ मुद्यांच्या चौकशीत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, तत्कालीन कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या सर्वावर सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली.
नांदेडचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ बी. जे. वाळके यांच्याकडे या चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८३(१) अन्वये करण्यात आलेल्या या चौकशीतून तत्कालीन संचालक व अधिकाऱ्यांचा बेलगाम कारभार तसेच बँकेचे उपविधी, राज्य शासन, राज्य बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या या रथीमहारथींमुळे बँकेला ३०० कोटींहून अधिक रकमेचा खड्डा पडल्याचे दिसते.
मागील काही वर्षांपूर्वी विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ अमृत गंभिरे (आता निवृत्त) यांनी एका स्वतंत्र चौकशीत, मोहन पाटील टाकळीकर ऊर्फ 'मोपाटा' यांच्यासह सर्व माजी संचालकांना 'क्लीन चिट' दिली होती. त्याच्या आधी तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी खतगावकरांसह सर्व संचालकांना दोषमुक्त केले होते. असे असले तरी बँकेच्या 'प्रतापी' माजी संचालकांच्या मागचा चौकशीचा ससेमिरा १० वर्षांनंतरही सुटलेला नाही, हे वाळके यांच्या ताज्या ९ डिसेंबर २०१३च्या अहवालातून पुढे आले आहे.
वाळके यांनी आपला अहवाल विभागीय सहनिबंधक, लातूर यांच्यासह बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना सादर केल्याचे समजते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वाळके यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला. २८ डिसेंबर रोजी होत असलेल्या प्रशासकीय मंडळाच्या सभेसमोर हा अहवाल ठेवला जात असल्याचे सांगितले. तथापि गोपनीयतेच्या कारणाखाली अन्य तपशील त्यांनी दिला नाही.
बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी अलीकडेच बँकेच्या दोषी माजी संचालकांवर कारवाईचे संकेत दिले होते. वरील अहवाल प्रशासक मंडळाने स्वीकृत केल्यास बँकेच्या माजी संचालक व अधिकाऱ्यांवर कलम ८८ची चौकशी लागू शकते. या चौकशीनंतर दोषी व्यक्तींकडून नुकसान झालेली रक्कम वसूल करण्याचे अधिकार आहेत. गंभिरे यांनी काही वर्षांपूर्वी माजी संचालकांना 'क्लीन चिट' दिली. त्या विरोधात बँकेने अपील केले आहे, ते शासनाकडे प्रलंबित असल्याने बँकेचे माजी संचालक पूर्णत: निर्दोष नाही ते स्पष्ट होते.
काही दिवसांपूर्वी बँकेची वार्षिक सभा झाली. या सभेसमोर ठेवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 'गोदावरी मनार'कडील थकीत रक्कम ११६ कोटी १८ लाख, 'कलंबर'-८३ कोटी ४३ लाख, 'जय अंबिका'-४९ कोटी २९ लाख आणि सूर्यकांताबाईंच्या 'हुतात्मा जयंतराव पाटील' या साखर कारखान्याकडे ४१ कोटी १७ लाख रुपये थकबाकी आहे. म्हणजे चार संस्थांकडेच २९० कोटी रुपये अडकले आहेत. बँकेवर लोकनियुक्त संचालकांची सत्ता असताना १९९५ ते २००३ या काळात संस्थांना वेगवेगळय़ा प्रकरणांमध्ये कर्ज मंजूर करताना झालेल्या नियमबाहय़ बाबी वाळके यांच्या चौकशीतून समोर आल्या आहेत. त्यांनी आपल्या अहवालात प्रत्येक कारखान्याकडील बाकी नमूद आहे.
वाळके यांना एकंदर १९ मुद्यांची चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. बँकेने त्यांना सादर केलेली माहिती तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची छाननी करून त्यांनी चौकशी पूर्ण केली. १९९५ पासूनच्या काही मुद्यांची चौकशी झाल्याने श्यामराव कदम, बळवंतराव चव्हाण, बाबासाहेब गोरठेकर, प्रकाश हस्सेकर, म. हाजी पाशा या दिवंगत माजी संचालकांवरही अहवालात अप्रत्यक्षपणे ठपका आला आहे.
माजी अध्यक्ष सर्वश्री भास्करराव खतगावकर, मोहन पाटील टाकळीकर, गोविंदमामा राठोड तसेच राज्य बँकेचे माजी संचालक गंगाधरराव कुंटूरकर, सूर्यकांताबाई पाटील यांच्यासह डी. बी. पाटील, नामदेव केशवे, गंगाराम ठक्करवाड, सुभाष वानखेडे, हरिहर भोसीकर, रोहिदास चव्हाण, विजय पाटील राजूरकर, गफ्फार खान, बापूसाहेब गोरठेकर, संभाजीराव मंडगीकर यांच्यासह स्नेहलताताई खतगावकर, मंगला महादेव निमकर, मथुताई सुरेश सावंत, गंगादेवी किशोर केसराळे आदी संचालकांवर वेगवेगळय़ा कर्जप्रकरणात जबाबदारी टाकण्याची शिफारस अहवालात करण्यात आली असल्याचे समजते.
बीड जिल्हा बँकेतील गैरव्यवहारात अनेक रथीमहारथींवर थेट कारवाया होत असताना, नांदेड जिल्हा बँकेतील रथीमहारथी १० वर्षांनंतरही सहीसलमात कसे, असा प्रश्न बँकेच्या अनेक हितचिंतकांनी अनेकदा उपस्थित केला. डॉ. डी. आर. देशमुख, शोभा वाघमारे यांनी बँक बचाव आंदोलन करताना दोषी व भ्रष्ट माजी संचालकांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा केली. आता वाळकेंच्या अहवालाच्या निमित्ताने बँकेचे माजी संचालक चौकशीच्या सापळय़ात चांगलेच अडकले असले, तरी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून बँकेचे कोटय़वधी रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी मागणी डॉ. डी. आर. देशमुख यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना केली.

'जय राष्ट्रवादी' म्हणावे!

शिवसेनेची जय महाराष्ट्र, भाजपची जय श्रीराम, आंबेडकर चळवळीतील जय भीम, संभाजी ब्रिगेडची जय जिजाऊ, गणेशभक्तांची जय गणेश.. या 'जय परंपरे'त आता आणखी एक भर पडण्याची शक्यता आहे.. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या िपपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना पक्षाच्या सूचना आहेत की, एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करताना, हस्तांदोलन करताना नमस्कार-चमत्कार करण्याऐवजी 'जय राष्ट्रवादी' म्हणावे! विशेष म्हणजे ही सवय काही काळापुरती नव्हे, तर आयुष्यभर लावून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
या सूचना तोंडी नाहीत, तर लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पिंपरी कार्यालयातील सूचनाफलकावर लावण्यात आल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेले 'जय राष्ट्रवादी' अभियान यापुढे कायम सुरू ठेवावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्र
ही सूचना असे सांगते, ''देशाचे नेते पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भेटल्यास 'जय राष्ट्रवादी' असा नमस्कार घालणे जरुरीचे आहे. सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेले हे अभियान कायम स्वरूपी 'जय राष्ट्रवादी' म्हणण्याची सवय लावून आयुष्यभर लावून घेवू या.''
यासंदर्भात, चौकशी केली असता काही कार्यकर्त्यांनी ते स्वयंस्फूर्तीने लावले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण 'जय राष्ट्रवादी' ची सवय लावून घेतली पाहिजे, असे पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले.
वादीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभियान सुरू केले आहे. त्याचा दाखला देत राष्ट्रवादीच्या िपपरी कार्यालयात सूचनाफलकावर लावलेल्या अशाच सूचनेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून युवकास मारहाण.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून युवकास मारहाण.
तरोडा बु भागातील सोनाई नगर येथे नाली बांधकामाच्या कामावरून महेश पुंडलिकराव देशमुख यांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी भाग्य नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या महेश देशमुख यांनी सुनील पाटील यांच्याशी किरकोळ बुधवारी सकाळी वाद घातला. नगरसेवक बाळू देशमुख यांच्या निधीतून नालीचे काम कसे काय करता ?,असे म्हणून देशमुख यांनी पाटील यांना मारहाण केली. याप्रकरणी सुनील पाटील यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१२-१३ चे पुरस्कार जाहीर.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१२-१३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले.देगलूर तालुक्यातील इब्राहिमपूर ग्रामपंचायतीने प्रथम, उमरी तालुक्यातील नागठाणा द्वितीय तर नांदेड तालुक्यातील गुंडेगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

गर्भ लिंग निदान कायदा


गर्भवती महिलेला किंवा तिच्या नातेवाईकांना किंवा अन्य कोणाही व्यक्तीला तिच्या गर्भाचे लिंग तोंडी सांगणे, थेट किंवा अप्रत्यक्षपणे कळवणे, अन्य मार्गाने सांगणे हा या कायद्याखालील दंडनीय अपराध ठरविण्यात आला आहे. या कायद्याखाली वैद्यकीय व्यावसायिकास तीन वर्ष मुदती पर्यंतचा कारावास आणि किंवा रु. 10 हजार पर्यंत दंड आणि पुढील प्रत्येक अशा अपराधास पाच वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागामार्फत आरोग्याची काळजी घेण्यात येत असली तरी प्रत्येक नागरिकांनी 'इलाजा पेक्षा प्रतिबंध बरा' या सुत्राप्रमाणे आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. आरोग्याविषयी जनजागृती करण्याचे कार्यही हा विभाग मोठया प्रमाणात करीत असतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या संभाव्य आजाराचे ही निदान होते व प्रतिबंधही होते. प्रत्येकाने आपले आरोग्य नेहमीसाठी तंदुरुस्त राहील याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

मराठा समाजाची स्वतंत्र सामाजिक-आर्थिक पाहणी खास.

प्रतिनिधी,

आरक्षणाच्या निर्णयासाठी आघाडी सरकारची लगबग
ओबीसींमध्ये समावेश न करता आरक्षण देणार

लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारच्या वेगाने हालचाली सुरू आहेत. मराठा समाजाचा इतर मागास वर्गामध्ये (ओबीसी) समावेश न करता आरक्षण देण्याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे समितीनेही अनुकूलता दर्शविली आहे. त्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला अनुसरून राज्यात जानेवारीपासून मराठा समाजाची स्वतंत्रपणे आर्थिक-सामाजिक मागासलेपणापबद्दलची पाहणी मोहीम राबविण्यात येणार आहे. साधारणत फेब्रुवारीअखेपर्यंत मराठा आरक्षणाचा सोक्ष-मोक्ष लावण्याचा आघाडी सरकारचा विचार असल्याचे समजते.
२००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला शासकीय नोकऱ्यांमध्ये व शिक्षणात आरक्षण देऊ, अशा केवळ आश्वासनावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वेळ मारून नेली होती. परंतु या वेळी हा विषय अधिक टोकदार बनलेला आहे. त्यामुळे सरकारने राणे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास करण्यासाठी मंत्री समिती नेमली. समितीने गेल्या सहा महिन्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अशा विभागवार बैठका घेतल्या. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची निवेदने स्वीकारली. ओबीसी संघटनांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. परंतु त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण देण्यास तीव्र विरोध आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न करता स्वंतत्र आरक्षण द्यावे लागेल, या निर्णयाप्रत समितीही आल्याचे समजते.
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातच नागपूरमध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सामान्य प्रशासन खात्याच्या राज्यमंत्री प्रा. फौजिया खान, आदी मंत्री व अधिकारी उपस्थितीत होते. त्यात राज्यात जानेवारीपासून मराठा समाजाच्या आर्थिक-सामाजिक मागासलेपणाच्या पाहणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळ कमी असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातून किमान ५ हजार कुटुंबांचे नमुना सर्वेक्षण करण्याचे ठरले. त्याचबरोबर शासकीय सेवेतील मराठा समाजाचे वर्ग चारपासून ते वर्ग एक पर्यंत किती प्रमाण आहे, याची माहिती सादर करण्याचे सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत. ही सर्व माहिती उपलब्ध झाल्यानंतर समितीचा अंतिम अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.
दोन मुख्य निकष : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचे झाले तर सध्याच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवावी लागणार आहे. ५० टक्क्य़ापेक्षा जास्त आरक्षणाची टक्केवारी वाढत असेल तर नागराज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाच्या आधारावर मराठा समाजाचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण सिद्ध करावे लागणार आहे. त्याचबरोबर घटनात्मक तरतुदीनुसार शासकीय सेवेत त्या समाजाचे पुरेसे प्रतिनिधीत्व आहे किंवा नाही, त्याचीही तपासणी करावी लागणार आहे. या दोन मुख्य निकषावरच मराठा समाजाच्या आरक्षणाचे भवितव्य ठरणार आहे.

फ्लोराईडमुळे फ्लोरोसीस


1.5 पीपीएम पैक्षा जास्त फ्लोराईडची मात्रा असलेले पाणी दीर्घकालापर्यंत पिण्यात वापरल्यास फ्लोरोसीस आजार होतो. यात मुख्यत: शरिरातील हाडावर, दातांवर परिणाम होतो. पिण्याच्या पाण्याबद्दल आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे. पाणीनमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल प्रकाशित करणे. शाळेतील विद्यार्थी व गृहभेटीद्वारे या आजाराचे सर्व्हेक्षण करुन अवश्यक तो औषधोपचार केला जातो. पिण्याच्या पाण्यातील आवश्यकतेपेक्षा जास्त असलेले फलोराईडचे प्रमाण कमी करण्याच्या घरगुती पध्दती विषयी माहिती दिली जाते.