गुरुवार, २६ डिसेंबर, २०१३

'जय राष्ट्रवादी' म्हणावे!

शिवसेनेची जय महाराष्ट्र, भाजपची जय श्रीराम, आंबेडकर चळवळीतील जय भीम, संभाजी ब्रिगेडची जय जिजाऊ, गणेशभक्तांची जय गणेश.. या 'जय परंपरे'त आता आणखी एक भर पडण्याची शक्यता आहे.. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या िपपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना पक्षाच्या सूचना आहेत की, एकमेकांना भेटल्यानंतर नमस्कार करताना, हस्तांदोलन करताना नमस्कार-चमत्कार करण्याऐवजी 'जय राष्ट्रवादी' म्हणावे! विशेष म्हणजे ही सवय काही काळापुरती नव्हे, तर आयुष्यभर लावून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
या सूचना तोंडी नाहीत, तर लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पिंपरी कार्यालयातील सूचनाफलकावर लावण्यात आल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेले 'जय राष्ट्रवादी' अभियान यापुढे कायम सुरू ठेवावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्र
ही सूचना असे सांगते, ''देशाचे नेते पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भेटल्यास 'जय राष्ट्रवादी' असा नमस्कार घालणे जरुरीचे आहे. सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेले हे अभियान कायम स्वरूपी 'जय राष्ट्रवादी' म्हणण्याची सवय लावून आयुष्यभर लावून घेवू या.''
यासंदर्भात, चौकशी केली असता काही कार्यकर्त्यांनी ते स्वयंस्फूर्तीने लावले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण 'जय राष्ट्रवादी' ची सवय लावून घेतली पाहिजे, असे पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले.
वादीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभियान सुरू केले आहे. त्याचा दाखला देत राष्ट्रवादीच्या िपपरी कार्यालयात सूचनाफलकावर लावलेल्या अशाच सूचनेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...