रविवार, २९ डिसेंबर, २०१३

रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी


जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती देऊन ही कामे त्वरित पूर्ण करावीत, असे आदेश पालकमंत्री  यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
जिल्हाधिकारी विक्रम कुमार, पोलिस आयुक्त संजय कुमार, पोलिस अधीक्षक इशू सिंधू, सिडकोचे मुख्य प्रशासक सुनिल केंद्रेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र जगताप, झेडपी सीइओ दीपक चौधरी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ' जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांसाठी ' डीपीडीसी ' च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांना गती देऊन ही कामे अधिक दर्जेदार होतील, याकडे लक्ष द्यावे. हज हाऊस व वंदे मातरम सभागृह या संदर्भातील कामांनाही गती द्यावी, ' अशी सूचना पालकमंत्री थोरात यांनी दिल्या.

औरंगाबाद ते पैठण, औरंगाबाद ते फर्दापूर तसेच येडशी-औरंगाबाद-धुळे या रस्त्यांच्या कामांची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डीएमआयसीअंतर्गत भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची भूमिका सकारात्मक आहे. टंचाईस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असून यासंदर्भातील आराखडाही तयार करण्यात आला आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत वन खात्याचा साहसी उपक्रम पार्कचा प्रस्ताव असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...