शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

केजरीवालांचा शपथविधी ...

विधानसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस 'सफाई' केल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी निश्चित केलेली तारीख २८ डिसेंबर
म्हणजे काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. असे घडण्यामागे निव्वळ योगायोग असल्याचे 'आप'कडून सांगण्यात येत असले तरी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची चर्चा आहे.

येत्या शनिवारी म्हणजे २८ डिसेंबर २०१३ रोजी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याच दिवशी भारतात काँग्रेसची स्थापना झाली होती. ए. ओ. ह्यूम यांनी २८ डिसेंबर १८८५ मध्ये भारतात काँग्रेसची स्थापना केली होती. केजरीवाल यांच्या 'आप' ने काँग्रेसवर तगडी मात केल्यानंतर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

दिल्लीत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 'आप'ला २८ जागा मिळाल्या आहेत. २८ आकडा आणि 'आप' यांच्यातील योगायोग हा आता चर्चेचा विषय बनू लागला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...