रविवार, २९ डिसेंबर, २०१३

नांदेडचे विद्यार्थी सुखरूप



बेंगळुरूहून नांदेडकडे येणाऱ्या एक्स्प्रेसला शनिवारी पहाटे कर्नाटकातल्या अनंतपूर येथे भीषण आग लागली. यामध्ये नांदेडच्या ज्ञानमाता शाळेचे विद्यार्थी प्रवास करीत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण हे सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनीच सुटकेचा निःश्वास घेतला. दरम्यान, नांदेड, हिंगोली व पूर्णा येथील १३ प्रवासी ज्या बोगीला आग लागली त्या बोगीत होते. त्यापैकी केवळ पाच जणांचा संपर्क होऊ शकला आहे.

नांदेड-बेंगळुरूर एक्स्प्रेसला अपघात झाल्याचे वृत्त सकाळी वाहिन्यांवरून सर्वप्रथम आल्यानंतर अनेक पालकांना हादरा बसला होता. याच रेल्वेत शहरातल्या नामांकित ज्ञानमाता शाळेचे ४० विद्यार्थी सहलीहून परतत होते. ज्या बोगीला आग लागली. त्याच्या शेजारीच हा डब्बा होता पण आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. रात्रभर जंगलातच वास्तव्य करून सकाळी हे विद्यार्थी दुसऱ्या रेल्वेने नांदेडकडे रवाना झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...