शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

मार्केटिंगसाठी इंटरनेट यूजरवर लक्ष



गेल्या काही वर्षांत भारतात मोबाइल क्रांतीबरोबर इंटरनेटचा प्रसारही झाला. सोशल नेटवर्किंग, इंटरनेट आदींचे प्रायव्हसीचे धोरण असते. मात्र, भारतात प्रायव्हसी धोरणांबाबत मोठ्या प्रमाणात अनास्था आहे. भारतातील बहुतेक इंटरनेट यूजरना प्रायव्हसी धोरणांविषयी फारशी माहितीदेखील नाही. ७५ टक्के यूजर एखादी वेबसाइट पाहण्यापूर्वी त्याचे प्रायव्हसीबाबतचे धोरण वाचत नाहीत; तसेच इंटरनेटद्वारे खासगी माहिती शेअर करण्यापूर्वी या संदर्भातील प्रायव्हसीचे धोरण न वाचणाऱ्यांचे प्रमाणही तेवढेच आहे. मात्र, नव्या वर्षात प्रायव्हसी धोरणाऐवजी संबंधित युजरला प्रायव्हसी किती मिळते हा प्रश्न असणार आहे. यूजर ऑनलाइनवर काय करतो यावर लक्ष ठेवले जाण्याची शक्यता आहे. यात ई-मेल, सोशल नेटवर्किंगवरील शेअरिंगवरही लक्ष राहण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावरील वाढते मार्केटिंग आणि इंटरनेट युजरच्या प्रमाणात होत असणारी वाढ यांच्यामुळे संबंधित युजरच्या प्रोफाइलवर लक्ष ठेवण्याच्या प्रमाणात २०१४ मध्ये वाढ होऊ शकते. एखाद्या युजरचे मॅपिंग दोन पातळीवर होते. विविध वेबसाइटचे सर्फिंग करताना लॉगइन न होता सरफेस ब्राउजिंगच्या माध्यमातून ट्रॅक केले जाते. यामध्ये किती वेळ सर्फिंग केले, कोणता कन्टेंट पाहिला, किती वेळा पाहिला आदींवर यातून लक्ष ठेवले जाऊ शकते. यातून विश्लेषण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्लॉग वा ई-मेलच्या बाबतीत ठिकाण, लिंग, वय इतक्यापर्यंत विचार केला जाऊ शकते. मात्र, यामध्ये माहिती चोरली जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

कंपन्यांना मार्केटिंगच्या दृष्टीने अशी माहिती महत्त्वाची आहे. कंपन्या त्यादृष्टीने डिजिटल मार्केटिंग करू शकतात. मात्र, संबंधित माहिती कशा पद्धतीने गोळा होते या पेक्षा कंपन्यांना यासाठी गोळा होणाऱ्या माहितीची काळजी आहे. एखाद्या व्यक्तीने व्हेकेशन, अशा विषयाचा ई-मेल केल्यास संबंधित व्यक्तीला ट्रॅव्हलच्या अॅड जाऊ शकतात. मात्र, आपल्या कन्टेंटवर कोणाचे तरी लक्ष, असू शकते याची जाण इंटरनेट वापरणाऱ्यांना असायला हवी. त्यामुळे यूजरनी पुरेशी दक्षता घ्यायला हवी, हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...