शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली

नांदेड : सामाजिक वनीकरण कार्यालय नांदेड, अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील रोपवाटिका तसेच मजुरांची संख्या यासंदर्भात मागितलेली माहिती देण्यास संबंधित विभाग दीड वषार्ंपासून टाळाटाळ करीत असून
पूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशालाही त्यांनी केराची टोपली दाखविली आहे.
अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील शेतकरी शिवाजीराव शिंदे यांनी वनीकरणकडे अर्धापूर व मुदखेड या तालुक्यात डिसेंबर २0११ ते मार्च २0१२ या कालावधीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामासंदर्भात माहिती मागितली होती. यात चालू रोपवाटिका व प्रत्येक रोपवाटिकेवरील गावनिहाय मजुरांची यादी, कुशल खर्चाच्या याद्या यासंदर्भात ६ जुलै २0१२ रोजी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. परंतु त्यांना माहिती मिळाली नाही. यानंतर शिंदे यांनी तहसीलदारांकडे माहिती मागितली. त्यावर तहसीलदारांनी पत्रव्यवहार केला. अखेर शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी १९ सप्टेंबर २0१३ रोजी तीनही तहसीलदारांना पत्र पाठवून तत्काळ माहिती उपलब्ध करुन द्या, असे आदेशित केले. परंतु या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...