शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेकडून तीन गुन्हे दाखल

नांदेड - महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विरोधी विभागातर्फे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर दिवसभरात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्यात. ज्ञानेश्‍वरनगरातील देवीदास व्यंकट बसवंते यांनी मंजूर नकाशाविरुद्ध बांधकाम केले. त्याचबरोबर निजाम कॉलनीतील अब्दुल शमी अब्दुल रज्जाक यांनी मंजूर नकाशाविरुद्ध बांधकाम केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लेबर कॉलनीतील विनायक बालाजी मस्के यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेवर मंजूर नकाशाविरुद्ध अनधिकृत बांधकाम केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिस ठाण्यात गेल्या आठवड्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन, तर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य बांधकामे पाडून टाकून त्यावर होणारा खर्च संबंधित मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यात येईल; तसेच त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हादेखील नोंद होईल, असा इशाराही पालिकेतर्फे देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...