सीबीआयची धडक : फायरमनची परीक्षा देखरेखीत
नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात अचानक धडक देऊन केंद्रीय गुन्हे अन्वेषणा(सीबीआय) च्या अधिकार्यांनी आज येथे रिक्त पदांची परीक्षा आपल्या देखरेखीत घेतली. या आकस्मिक घडामोडीमुळे देशभरातून येथे फायरमनची परीक्षा देण्यासाठी आलेल्या बेरोजगारांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात फायरमनच्या चार जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याबाबतचे पात्रता अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर होती. पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा आज पार पडणार होती. त्यासाठी देशभरातील विविध प्रांतातून ८३ उमेदवार नागपुरात आले होते. मात्र, या चारही पदाचे उमेदवार आधीच फिक्स झाले (रिक्रूटमेंट सेटिंग) असून, देखाव्यासाठी परीक्षेची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची तक्रार सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी आज अचानक अग्निशमन महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सीबीआय अधिकार्यांचे पथक पाठविले. सीबीआयचे निरीक्षक प्रदीप लांडे, मनोज नायर आणि हनुमानसिंग जांगीड या अधिकार्यांच्या पथकाने परीक्षा केंद्राची कसून तपासणी केली. काही कागदपत्रे ताब्यात घेतल्यानंतर ८३ उमेदवारांची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया उपरोक्त सीबीआय अधिकार्यांच्या देखरेखीत पार पाडली. प्रत्येक तपासणीची माहिती सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे जाणून घेत होते. त्यामुळे ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदश्री ठरली. ८३ पैकी ५६ उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यातून आता मेरिटनुसार चार जणांची निवड केली जाणार आहे. सीबीआयच्या या आकस्मिक कारवाईमुळे कथित ‘रिक्रूटमेंट सेटिंग’ला चाप बसला. दुरदुरून आलेल्या पात्र उमेदवारांनी त्यामुळे सीबीआय अधिकार्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...