![]() |
Visit Tourist, Picnic Places in Nanded |
मग मी उत्तर म्हणुन एक कविता केली,
ती अशी:::::::::
अवघड वाटे तुमचा प्रश्नचि |
उत्तर कैसे देऊ सडे ||
प्रेक्षणीय स्थळ , फिरण्या गड हे |
महाराष्ट्र हा कमी पडे ||धृ.||
फिरा कितीही पुरतची नाही |
वेळची अपुल्या फिरण्याला ||
सृजन मनोहर स्थलशक्ती या |
महाराष्ट्र सानिध्याला ||1||
सर्वप्रथम मम आवडतीचा |
सह्याद्रिचा परिसर हा ||
ञ्यंबकपासुन आंबोलीचा |
अथांग हरितक सागर हा ||2||
मधे लागती हरिश्चंद्रगड |
भिमाशंकर, खंडाळा ||
शिवथरघळ अन महाबळेश्वर |
कोयना आणिक पन्हाळा ||3||
सह्याद्रीचा हाच परिसर |
साक्ष देतसे वीरांची ||
तुकया आणिक रामदासासम |
ओळख होई संतांची ||4||
याच परिसरामधुनी उमलती |
रायगडापरि गडकिल्ले || वीर आपुले याआधारे |
शञुवरि तुटूनि पडले ||5||
सह्यगिरीसम अनेक पर्वत |
सामविले या स्थळी ||
बालाघाट अन् सातपुडा हे |
नमुना असति जुळी ||6||
साविञी अन गोदा भीमा |
कृष्णा सीनेतटी ||
तीर्थस्थले अन् सुपीक भुमी |
वनराईंची दाटी ||7||
विदर्भ ,कोंकण ,गोमंतक अन् |
मराठवाडा सारी ||
खानदेश ,नाशिक ,पुण्याची |
असे संस्कृती न्यारी ||8||
सर्व भाग हे महाराष्ट्राचे |
अपुर्ण सर्वांविण ||
मुकुंद कवीचा प्रयत्न छोटा |
झाला सुफळ सुपर्ण ||9||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please comment here...