बुधवार, १ जानेवारी, २०१४

हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द


weeklymarathiswarajya.blogspot.in

भारताने ऑगस्टावेस्टलँड कंपनीशी केलेला ३६०० कोटींचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार रद्द केला. केंद्र सरकारने व्हिआयपींसाठी बारा हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने करार रद्द केला.

हेलिकॉप्टर खरेदीचे कंत्राट मिळवण्यासाठी ऑगस्टावेस्टलँड या ब्रिटीश-इटालियन कंपनीने बराच पैसा खर्च केला. हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या अखत्यारित राहणार होती. त्यामुळे हवाई दलाच्या विविध विभागांकडून कराराला परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळवण्यात अडचणी येऊ नये यासाठी कंपनीने सुमारे ३०० कोटी रुपयांची दलाली देऊन भारतीय कायद्याचे उल्लंघन केले; असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ही वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती संरक्षणमंत्र्यांनी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

याआधी ऑगस्टावेस्टलँड कंपनीला संरक्षण मंत्रालयाने अखेरची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसची मुदत संपल्यानंतर मंत्रालयाने करार रद्द केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...