शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

सोमवारी लोकशाही दिन

नांदेड, दि. 27:- राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिण्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येत असतो. त्यानुसार सोमवार 6 जानेवारी 2014 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. 

या दिवशी महसूल, ग्रामविकास, नगरविकास, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, राज्य परिवहन, सहकार, पोलीस, कृषी व जिल्हा पाणी पुरवठा विभाग, जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्यांच्याकडे लोकशाही दिनामधील प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे उपस्थित राहतील. 
सकाळी 10 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत निवेदनांची नोंदणी केली जाईल. त्यानंतर प्राप्त अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास लागलीच सुरुवात करण्यात येईल.
लोकशाही दिनाच्या 15 दिवसापूर्वी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविणे आवश्यक राहील. प्रथम तालुकास्तरावरील लोकशाही दिनामध्ये अर्ज केलेला असावा. त्याचा टोकन क्रमांक व त्याची प्रत सोबत आणणे आवश्यक राहील. अन्यथा अर्ज स्विकारला जाणार नाही. तहसीलदार यांनी दिलेल्या उत्तराची प्रत सोबत असणे आवश्यक राहील. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राज्यस्व व अपिल्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारल्या जात नाहीत. 
या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी व अडचणी एकत्रितरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिण्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here...